Tarun Bharat

… आणि 328 दिवसांनी ख्रिस्तीना पृथ्वीवर परतली

ऑनलाईन टीम / कझाकिस्तान : 

दीर्घकाळ अंतराळात राहणारी अमेरिकेची अंतराळवीर ख्रिस्तीना कोच हिने आज विक्रम केला आहे. ख्रिस्तीना तब्बल 328 दिवस आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात राहून आज सुखरूपपणे पृथ्वीवर परतली.

कझाकिस्तानच्या डझहेजझगन स्थानकावर गुरुवारी स्थानिक वेळेसुनार पहाटे 4.12 वाजता ख्रिस्तीना परतली. या वेळी तिच्या बरोबर रशियाचे सोयूझ कमांडर अलेक्झांडर स्काव्होत्सोव आणि युरोपचे अंतराळवीर लुका पारमिटनो होते. हे दोघे गेल्या वर्षी जुलैमध्ये नासाचे ऍडय़ू मॉर्गन यांच्या बरोबर गेले होते. 201 दिवस ते अंतराळात राहीले होते. दरम्यान, ऍडय़ू मॉर्गन हे 17 एप्रिलला पृथ्वीवर परतणार आहे.

नासाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार ख्रिस्ती 328 दिवस अंतराळात राहीली. त्या दरम्यान, ख्रिस्तीने पृथ्वीला 5 हजार 248 वेळा प्रदक्षिणा घातल्या. तर 3.9 कोटी किलोमीटर अंतर पार केले. हे अंतर पृथ्वी ते चंद्र यांच्यामध्ये 291 फेऱया होतील एवढे आहे. तसेच गेल्या 11 महिन्यांत तिने 6 वेळा स्पेस वॉक केले असून वॉकच्या वेळी ती एकूण 42 तास 15 मिनिटे स्थानकाबाहेर होती.

 

Related Stories

अमेरिकेतून येताहेत अनेक ऐतिहासिक मूर्ती

Amit Kulkarni

बर्फ, वाळू, समुद्राचा संगम

Patil_p

इंडोनेशियात मिळाले सर्वात मोठे फुल

Amit Kulkarni

केरळमध्ये भाडेतत्वावर मिळणार पोलीस

Amit Kulkarni

माणूस दीर्घायुषी का?

Amit Kulkarni

जगातील सर्वात मोठे मांजर

Patil_p