Tarun Bharat

आण्णा गँगला मोका; गँगच्या म्होरक्यासह 9 जणांवर कारवाई

कोल्हापूर प्रतिनिधी

आंबा (ता. शाहूवाडी) येथील सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या आण्णा टोळीवर पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. टोळी म्होरक्या लक्ष्मण आण्णा जाधव याच्यासह 9 गुंडावर मोका लावण्यात आला. विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी या कारवाईस मंजूरी दिली आहे.

सचिन रामचंद्र नाचनकर (वय 37 रा. कोतोली, ता. शाहूवाडी), मंदार तानाजी चोरगे (वय 34 रा. कात्रज, पुणे), शिवाजी हरीबा कदम (वय 36 रा. अमेणी ता. शाहूवाडी), नामदेव उर्फ अविनाश जालिंदर कदम (वय 26 रा. शिराळा जि. सांगली सध्या डोंबीवली), शुभम उर्फ सोन्या शंकर चोरगे (वय 22 रा. वांगणी ता. वेल्हा जि. पुणे) यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तर विशाल उर्फ आल्या अरुण वाल्हेकर (रा. कात्रज पुणे), लक्ष्मण आण्ण जाधव (आळंदी दिघी रोड दिघी पुणे), सुरज बर्डे, ओंकार तर्फ तेडय़ा यांचा शोध सुर आहे. या 9 जणांवर मोका कारवाई करण्यात आली आहे.

आंबा (ता. शाहूवाडी) येथे मंगळवार 4 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास येथील शांतय्या शंकरय्या स्वामी यांच्या घरावर अज्ञातांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. दरोडेखोरांनी स्वामी यांना मारहाण करुन त्यांच्या मुलांना व महिलांना तोंडाला पट्टी बांधून डांबून ठेवले होते. तलवार, पिस्तुलचा धाक दाखवून घरातील सोने, चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोटार असा सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. पुणे येथील सराईत टोळीस हॉटेल चालविणाऱ्यानेच टीप देवून मालकाच्या घरी लुटीचा कट रचल्याचे समोर आले होते. या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांवर गुन्हा दाखल केला होता. सचिन नाचनकर, मंदार चोरगे, शिवाजी कदम, नामदेव उर्फ अविनाश जालिंदर कदम, शुभंम उर्फ सोन्या शंकर चोरगे यांना अटक केली होती. त्यांच्याकडून 2 मोटार, 1 दुचाकी, 4 मोबाईल असा सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणात विशाल उर्फ आल्या अरुण वाल्हेकर (रा. कात्रज पुणे), लक्ष्मण आण्णा जाधव (आळंदी दिघी रोड दिघी पुणे), सुरज बर्डे, ओंकार तर्फ तेडय़ा यांचा पोलीस शोध घेत आहेत.

या 9 संशयीतांवर खून, मारामारी, दरोडा, चोरी, मारहाण, शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करणे या कलमांन्वये कोल्हापूर, पुणे ग्रामीण, मुंबई नवी मुंबई, सातारा, पुणे, परिसरात 50 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडून जनतेच्या जिवीतास व मालमत्तेस धोका निर्माण झाला असल्याने पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अंतर्गत प्रस्ताव तयार करण्याचे आदेश शाहूवाडी पोलीस अधिक्षक रविंद्र साळोखे यांना दिले. यानुसार शाहूवाडी पोलीस अधिक्षक रविंद्र साळोखे आणि शाहूवाडी पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी आण्णा गँग विरोधात मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करुन तो पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्याकडे पाठविला. हा प्रस्ताव छाननी करुन अंतिम मंजूरीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्याकडे पाठविला. गुरुवारी विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी या प्रस्तावास मंजूरी दिली.

Related Stories

राष्ट्रपती निवडणूक : गोव्यातील काँग्रेसचे आमदार चेन्नईत…

Archana Banage

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी सर गंगाराम रुग्णालयात दाखल; डॉक्टर म्हणाले – प्रकृती स्थिर

Tousif Mujawar

Flood situation : आतातरी सरकारने कोकणाला मदत द्यावी-देवेंद्र फडणवीस

Archana Banage

एकनाथ शिंदेंच्या गोटातील २१ आमदारांचा आमच्याशी संपर्क; संजय राऊतांचा दावा

Archana Banage

देशात कोरोनाबाधितांची संख्या 70 हजारांवर

datta jadhav

रिक्षाचालकाचे नशीब रातोरात बदलले! २५ कोटींची लागली लॉटरी

Archana Banage