Tarun Bharat

आण्विक गळतीनंतर वरिष्ठ वैज्ञानिकाचा गूढ मृत्यू

चीनमधील दुर्घटनेनंतर वाढली साशंकता

वृत्तसंस्था/ बीजिंग

चीनच्या एका नव्या आण्विक प्रकल्पातील दुर्घटनेच्या 10 दिवसांनीच वरिष्ठ आण्विक वैज्ञानिक झांग झिजिआन हे गूढ स्थितीत मृतावस्थेत आढळले आहेत. झांग एका उंच इमारतीवरून कोसळल्यावर मृत्युमुखी पडल्याचे सांगण्यात येत आहे. पण चीन आण्विक दुर्घटना जगापासून लपविण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा सुरू आहे. झांग हे प्रतिष्ठित हार्बिन इंजिनियरिंग युनिव्हर्सिटीत कुलगरू म्हणून कार्यरत होते.

1963 मध्ये जन्मलेले झांग दोन वर्षांनी निवृत्त होणार होते. झांग यांच्या मृत्यूची माहिती युनिव्हर्सिटीच्या वीबो खात्यावरून प्रसारित झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत याला हत्या मानण्यास नकार दिला आहे.

यापूर्वी चीनच्या एका आण्विक प्रकल्पात गळती झाल्यावर जगभरात खळबळ उडाली होती. एक आठवडय़ापूर्वी झालेली ही गळती जगापासून लपवून ठेवण्यात आली होती. या आण्विक प्रकल्पाच्या निर्मितीत प्रेंच पॉवर ग्रूप ईडीएफची सुमारे 30 टक्के हिस्सेदारी सामील आहे. ईडीएफने या गळतीवरून स्वतःची स्वतंत्र चौकशीही सुरू केली आहे. पण आतापर्यंत गळतीच्या भयावहतेसंबंधी कुठलीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

अमेरिकेकडून मागितली मदत

मागील एक आठवडय़ापासून अमेरिकेचे प्रशासन या गळतीच्या अहवालाचे आकलन करत होते. या अहवालात प्रेंच कंपनी ईडीएफने युएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जीच्या मदतीची विनंती केली होती. कंपनीने यात किरणोत्सर्गाचा इशारा दिला होता.

Related Stories

बनावट वैमानिकांमुळे पाकिस्तानवर ओढवली नामुष्की

Patil_p

मालगाडी दुर्घटनेत काँगोमध्ये 60 ठार

Patil_p

न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअरमध्ये गोळीबार

datta jadhav

जगभरात 1.11 कोटी रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

आयएस’च्या गोळीबारात इराणमध्ये 15 ठार

Amit Kulkarni

हनोई येथे सुरू झाले जगातील पहिले गोल्ड प्लेटेड हॉटेल

datta jadhav