Tarun Bharat

आतापर्यंत 15 देशात मंकीपॉक्सचा फैलाव

भारतातही आरोग्य मंत्रालयाकडून सावधानता

न्यूयॉर्क / वृत्तसंस्था

Advertisements

कोरोना महामारीशी झुंज देत असतानाच आता मंकीपॉक्सचा धोका वाढत आहे. अवघ्या 15 दिवसात हा आजार 15 देशांमध्ये पसरला आहे. मंकीपॉक्स रुग्णांसाठी 21 दिवसांचे विलगीकरण अनिवार्य करणारा बेल्जियम हा पहिला देश बनला. याचदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) इशारा देत कोणत्याही देशात मंकीपॉक्सचा एक रुग्ण सापडला तरीही सावधानता बाळगण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. ब्रिटन, अमेरिका, इटली, स्वीडन, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, बेल्जियम, नेदरलँड, इस्रायल, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमध्ये मंकीपॉक्सची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अवघ्या दोन आठवडय़ात रुग्णांची संख्या 100 च्या पुढे गेली आहे. मात्र, या आजाराने आतापर्यंत एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही.

भारतातही मंकीपॉक्सचा झपाटय़ाने फैलाव होण्याची शक्यता गृहीत धरून विमानतळांवर सतर्कता राखली जात आहे. मुंबई महानगरपालिकेने मंकीपॉक्सच्या संशयित रुग्णांसाठी कस्तुरबा रुग्णालयात 28 खाटांचा विलगीकरण वॉर्ड तयार केला आहे. मात्र, देशात आतापर्यंत या आजाराचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मंकीपॉक्सबाबत केंद्र सरकारची चिंताही वाढली आहे. आरोग्य मंत्रालयाने विमानतळ आणि बंदरांच्या अधिकाऱयांना देशांमध्ये प्रवास करून परतलेल्या कोणत्याही आजारी प्रवाशांना ताबडतोब वेगळे करण्याचे आणि नमुने नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. वेगाने पसरणाऱया संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Related Stories

पंतप्रधान मोदींना भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

Patil_p

कर्नाळमध्ये मजूर, अमेरिकेत ‘डाटा सायंटिस्ट’

Patil_p

अमेरिकेत हिमवादळ, न्यूयॉर्क अन् बोस्टनमध्ये वीज गुल

Patil_p

‘सीरियल किलर्स’वर जडले प्रेम

Patil_p

मेक्सिकोत कोरोनाबळींची संख्या 95 हजारांवर

datta jadhav

डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार बाधित

Patil_p
error: Content is protected !!