Tarun Bharat

आता अनिल परब यांचा नंबर…; सोमय्यांचे नवे ट्विट

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :

भाजप नेते किरीट सोमय्या मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. आता पुन्हा एकदा परिवहन मंत्री अनिल परब सोमय्या यांच्या रडावर आले आहेत. परब यांच्यासंदर्भात सोमय्या यांनी आज नवे ट्विट केले आहे. त्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”आता अनिल परब यांचाही नंबर लागणार. अनधिकृत, बेनामी रिसॉर्ट आणि रिसॉर्ट बांधकामासाठी आलेला पैसा… चौकशी होणार. भारत सरकारनं दापोली कोर्टात तक्रार दाखल केली आहे. 30 मार्च रोजी सुनावणी होणार.” सोमय्यांनी यांनी परब यांच्या दोन रिसॉर्टचे फोटोही यामध्ये शेअर केले आहेत.

दरम्यान, सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वीच रश्मी ठाकरे आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचे कोकणात अनधिकृत बंगले असल्याचा आरोप केला होता. यासोबत किनारपट्टी भागात अनिल परब यांचे बंगले असल्याचे सांगितले होते. मुरुड गावात परब यांनी बेकायदेशीररित्या रिसॉर्ट आणि बंगला बांधला आहे. ज्याची चौकशी सुरु असून येत्या काही दिवसांत त्यावर कारवाई होणार आहे.

Related Stories

सांगली : अहमदाबादवरून साळशिंगेत आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

Sushant Singh Rajput Death Anniversary: सुशांतचा आजपर्यंतचा फिल्मी प्रवास फक्त एका क्लिकवर

Abhijeet Shinde

शोपियां चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

कांदा निर्यात रद्द करण्याची मागणी

Patil_p

कोडोलीत आत्तीच्या मृत्युच्या धक्क्याने भाचीचा मृत्यू

Sumit Tambekar

मान्सूनचा परतीचा प्रवास येत्या तीन दिवसांत सुरू होणार

datta jadhav
error: Content is protected !!