Tarun Bharat

आता उजनी धरणातून सुरू होणार विमानसेवा…

करमाळा / प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील हनुमान जन्मभूमी कुगाव, पंढरपूर, इंदापूर, पुण्याचा प्रवास स्वस्तात आणि जलद व्हावा म्हणून उजनी धरणातून  विमानसेवा  सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या  माध्यमातून धरणातील तीन ठिकाणांची पाहणी करण्यात आली असून, त्यातील दोन ठिकाणे तांत्रिकदृष्ट्या अडचणीची ठरणार आहेत. त्यामुळे इंदापूरजवळील कालठण  हे ठिकाण निश्‍चित करण्यात आले असून, तसा अहवाल नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाला  पाठविण्यात आला आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या मागणीनुसार उजनी धरणातून विमानसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर धरणाच्या दरवाजाजवळ एक ठिकाण विमानसेवेसाठी उत्तम आहे. मात्र, धरणाच्या सुरक्षिततेच्या कारणावरून धरणाजवळ परवानगी देता येणार नाही, असे उजनी जलाशय व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले. तर कुंभारगाव परिसरातील ठिकाणी परदेशातून विविध पक्षी येतात आणि त्या ठिकाणी पक्षी निरीक्षण केंद्र आहे. त्यामुळे त्या ठिकाणालाही मान्यता देता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आता कालठणची जागा निश्‍चित करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खासगी टेक्‍निकल एक्‍स्पर्ट यांनी त्या ठिकाणांची पाहणी केली आहे. आता नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडून त्यांच्या अहवालाचा अभ्यास करून त्यांच्याकडून पुन्हा स्वतंत्रपणे पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असेही सांगण्यात आले. तत्पूर्वी, त्याला उजनी जलाशय (जलसंपदा) आणि पर्यावरण विभाग व एअर ट्राफिक कंट्रोल विभागाची मान्यता घ्यावी लागणार आहे.

उजनी धरणातून विमानसेवा सुरू करण्याच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून खासगी तांत्रिक तज्ज्ञांकडून पाहणी झाली. त्यांनी तीन ठिकाणांची पाहणी केली असून त्यापैकी इंदापूरजवळील कालठण हे ठिकाण सोयीचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यासाठी आमच्याकडून ना-हकरत प्रमाणपत्र दिले जाणार असल्याचे उजनी जलाशयाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी सांगितले. 

Related Stories

बॅटरी, दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद

Patil_p

महाराष्ट्र केसरीचा आखाडा यंदा पुण्यात रंगणार

Patil_p

१५ लाखाचं बक्षीस असणारा माओवादी एटीएसच्या ताब्यात

Archana Banage

निवडणूक घेऊन तेरणाचा हंगाम सुरू करा – आ. राणाजगजितसिंह पाटील

Archana Banage

आंबोली घाटात अज्ञात युवतीने घेतली उडी

Anuja Kudatarkar

मराठा आरक्षण लढ्याचे कोल्हापुरातून रणशिंग !

Archana Banage