Tarun Bharat

आता एसएमएसच्या आधारे जीएसटी परतावा

Advertisements

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सरकारने प्रत्येक महिन्याला वस्तू आणि सेवा कर(जीएसटी) परतावा दाखल करण्यासाठीच्या नियमात मोठा बदल केला आहे. आता येत्या काळात आपला जीएसटी परतावा सादर करण्यासाठी एसएमएस सुविधा मिळणार आहे. कारण महिन्याला जमा करण्याचा जीएसटीआर 3 परतावा सादर केला जाणार आहे. ही सुविधा केंद्र सरकारने सोमवारपासून सुरु केली.

 नवीन सेवेच्या आधारे 22 लाख नोंदणीकृत करदात्यांना जीएसटी सादर केल्यावर फायदा होणार आहे. व्यापाऱयांकडून महिन्याला परतावा सादर करण्यासाठी बार कॉमन पोर्टलवर आपल्या खात्यामध्ये लॉगइन केले जाते. ही सुविधा ऍक्टिवेट करण्याची गरज आहे. यानंतर करदात्याला निल जीएसटी सादर करण्यासाठी जीएसटी पोर्टलवर लॉग इन करण्याची आवश्यकता असून यामुळे केवळ एसएमएसच्या आधारे परतावा सादर करणे सोपे होणार आहे. 

 एसएमएस पाठविण्याची सोय

जीएसटी वेबसाइटवर उपलब्ध असणाऱया माहितीच्या आधारे व्यापाऱयांना निल जीएसटी परतावा सादर करण्यासाठी 14409 या नंबरवर एसएमएस पाठविता येणार आहे. यामध्ये सर्व व्यापाऱयांना जीएसटीआर 3 बी हा फॉर्म भरता येणार आहे.

Related Stories

वेदान्ता बनणार खासगी कंपनी ?

Patil_p

गो एअरकडून सवलतीची योजना

Patil_p

तिसऱया दिवशी सेन्सेक्सचा टप्पा 39 हजार पार

Patil_p

डिजिटल व्यवहारांमध्ये तेजी?

Patil_p

सेन्सेक्सची 454 अंकांची उसळी

Amit Kulkarni

ऍमेझॉन, वेरीझॉन व्होडाफोन आयडियात गुंतवणूक करणार

Patil_p
error: Content is protected !!