Tarun Bharat

आता ऑनलाईद्वारे घरपोच मिळणार मासे

मत्स्य खात्याची योजना : बेंगळूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू

बेळगाव / प्रतिनिधी

मत्स्य खवय्यांसाठी मत्स्यपालन विभागाने एक अभिनव योजना राबविली असून आता खवय्यांना ऑनलाईनद्वारे घरपोच मासे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे खवय्यांना मासे खरेदीसाठी बाजारात जाण्याची तसदी घ्यावी लागणार नाही. सध्या ही योजना बेंगळूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू असून लवकरच शहरात राबविली जाणार आहे.

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत ही अभिनव योजना राबविण्यात येणार असून या योजनेसाठी मोबाईल ऍप तयार करण्यात आले आहे. या आत्मनिर्भर योजनेंतर्गत हजारो युवकांना मत्स्योद्योग खात्यामार्फत रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्यात व जिल्हय़ात मत्स्याहार करणाऱयांची संख्या अधिक आहे. पण मासे खवय्यांना खरेदीसाठी बाजारात धावपळ करावी लागत होती. त्यामुळे वेळ वाया जातो. मात्र या योजनेमुळे ग्राहकांना वेळेत व ताजे मासे उपलब्ध होणार आहेत.

मत्स्य खात्याने ऑनलाईन मासे विक्रीसाठी एक ऍप तयार केले असून याद्वारे ग्राहकांना माशांचे प्रकार व दरही मिळणार आहे. या ऍपद्वारे घर बसल्या ऑनलाईन मासे मागवून खवय्ये आपल्या जिभेचे चोचले पुरवू शकतात. या योजनेला नुकतीच बेंगळूरमध्ये सुरुवात झाली असून ग्राहकांचा प्रतिसाद वाढल्यास इतर जिल्हय़ांमध्ये देखील ही योजना राबविण्यात येणार आहे.

राज्यातील मत्स्य उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टिकोनातून मत्स्यपालक शेतकऱयांना मत्स्यबीज देण्यात येते. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षित मासे विक्रीला प्राधान्य देण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. त्याचबरोबर माशांचे उत्पादन वाढविण्यासाठी खात्यामार्फत शेत तलावासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे.

Related Stories

गृहशोभा प्रदर्शनाचे शेवटचे 4 दिवस

Amit Kulkarni

घरासमोर कार, हल्ले वारंवार

Amit Kulkarni

कर्मचाऱयांतील दुहीमुळे नोकर संघटनेचे काम स्थगित

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हस्तांतराकडे लक्ष

Amit Kulkarni

शेतकऱयांना होणार सागवान रोपांचे वितरण

Amit Kulkarni

निपाणी तालुक्यात कोरोनाचा सहावा बळी

Patil_p
error: Content is protected !!