Tarun Bharat

आता ओडिसातून लाखो रुपयांचा गुटखा गोव्यात

मालाचा मालकच पार्सल रुममध्ये न आल्याने संशय बळावला

प्रतिनिधी /मडगाव

कोकण रेल्वे पोलिसांनी मडगाव रेल्वे स्थानकावरुन आणखी 14 लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ओडिसा राज्यातून हा माल गोव्यात आणण्यात आला होता.

प्राप्त माहितीनुसार या पार्सलवर पणब गुप्ता असे नाव लिहीले होते. म्हणजे 14 लाख रुपये किंमतीचा हा गुटखा ओडिसातील ज्या व्यक्तीने पाठवला होता त्या व्यक्तीने मडगावातील पणब गुप्ता यांच्या नावे पाठवण्यात आला होता. मात्र, गेल्या काही दिवसापूर्वी 28 लाख रुपयांचा गुटखा मडगाव रेल्वे स्थानकावर जप्त करण्यात आल्याची खबर गोव्यात सर्वत्र पसरली तेव्हा तथाकथित पणब गुप्ता नावाची ही व्यक्ती मडगाव रेल्वे स्थानकाच्या पार्सल रुममध्ये पडून असलेला हा 14 लाख रुपये किंमतीचा माल गोळा करण्यासाठी आलीच नाही.

अनेक दिवस हा माल पार्सल रुममध्ये पडून असल्याची खबर कोकण रेल्वे पोलिसांना लागताच त्यांनी नियम न मोडता हा माल जप्त केला. पाहतो तो या 15 गोणपोत्यात गुटख्याची पाकिटे होती. त्याची किंमत अंदाजे 14 लाख इतकी असल्याची पोलीस सुत्रांनी सांगितले.

चौकशीची मागणी

दरम्यान गोव्यात ज्या गतीने गुटख, तंबाखुसारख्या सौम्य अमली पदार्थाची आवक होत आहे त्याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी ‘गोवा कॅन’चे निमंत्रक रोलंड मार्टीन यांनी केली आहे.

Related Stories

सावळवाडा पेडणे कोरोना केअर सेंटरमध्ये 100 खाटांची सोय

tarunbharat

कर्मचारी कोरोनाबाधित आढळला काणकोण पालिका दोन दिवस बंद

Patil_p

राज्यपाल श्रीधरन पिल्लई शपथबद्ध

Omkar B

आमदार अपात्रता याचिका सुनावणीस मुहूर्त सापडेना

Patil_p

ट्रक -रुग्णवाहिका अपघातात रुग्ण ठार, दोघे जखमी

Amit Kulkarni

कोरोना रोखण्यासाठी ‘दिल्ली मॉडेल’ राबवणार

Patil_p