Tarun Bharat

आता क्वारंटाईनसाठी मंगल कार्यालयांचे बुकिंग

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोनाचा प्रसार वाढत चालल्याने रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांसह नागरिकांना होम क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे. विविध हॉटेल्समध्ये या नागरिकांना ठेवण्यात आले असून याला स्थानिक नागरिकांचा विरोध वाढत आहे. तसेच आगामी काळात होम क्वारंटाईनची संख्या वाढण्याची शक्मयता गृहीत धरून  त्यांची सोय मंगल कार्यालयांमध्ये करण्याची तयारी सुरू झाली आहे. त्याकरिता मंगल कार्यालयांची यादी देखील बनविण्यास प्रारंभ झाला आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांच्या कुटुंबीयांसह संपर्कात आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्यांसह निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेल्या नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यास होम क्वारंटाईन नागरिकांची संख्या देखील वाढण्याची शक्मयता आहे. त्यामुळे आवश्यक तयारी महापालिका प्रशासनातर्फे चालविली आहे. सध्या विविध ठिकाणी असलेल्या हॉटेल्समध्ये नागरिकांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. होम क्वारंटाईन घोषित करण्यात आलेल्या नागरिकांना  ठेवण्यासाठी आणखी काही हॉटेल्सची यादी तयार करण्यात आली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी याला जोरदार विरोध चालविला आहे. विलगीकरण कक्षातच किंवा शहराबाहेर संशयितांना ठेवण्यात यावे, अशी मागणी होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने मंगलकार्यालयांची यादी तयार करण्यास प्रारंभ केला आहे.

शहर आणि उपनगरांमधील सर्व मंगलकार्यालयांची यादी तयार करून उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेण्यात येत आहे.  त्याबाबतचा अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. संशयित रुग्णांची संख्या वाढल्यास मंगलकार्यालयांचा उपयोग  करून घेण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Stories

प्रवाशांच्या तपासणीसाठी जिल्हय़ात 23 चेकपोस्ट

Amit Kulkarni

हिंदवाडी येथे जुगारी अड्डय़ावर छापा

Patil_p

तनिष्क : आजपासून नव्या भव्य दालनात

Amit Kulkarni

विजयनगर पाठोपाठ जयनगर येथे 22 लाखांची घरफोडी

Tousif Mujawar

मोबाईल चोरणाऱया त्रिकुटाला अटक

Amit Kulkarni

पोलिसांनीही केले नववर्षाचे स्वागत

Amit Kulkarni