Tarun Bharat

आता खानापूर रस्त्याशेजारी पुन्हा खोदाई

केबल घालण्यासाठी खोदला रस्ता : वाहनधारकांना अडथळा

प्रतिनिधी /बेळगाव

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत राबविण्यात येणारी कामे अंतिम टप्प्यात सुरू आहेत. ही कामे पूर्ण होतात न होतात तोच पुन्हा रस्त्याशेजारी खोदाई करण्याचे सत्र सुरू आहे. खानापूर रोडवर बीएसएनएल कार्यालयाशेजारी खोदाई करण्यात आली असून मुख्य रस्त्यावर मातीचे ढिगारे पसरले आहेत. अलीकडेच सुसज्ज केलेल्या खानापूर रस्त्यावर खोदाई करण्यात आल्याने वाहनधारकांना अडथळे पार करावे लागत आहेत.

खानापूर रोडचे काँक्रिटीकरण स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात आले आहे. या रस्त्याशेजारील गटारीचे काम करण्यात आले नाही. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. येथील गटारीचे काम प्रलंबित असताना बीएसएनएल कार्यालयाशेजारी खोदाई करण्यात येत आहे. संचयनी चौक ते गोगटे चौकपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना या रस्त्यावर वाहनधारकांना अडथळे निर्माण झाले आहेत. या रस्त्याचे काम पूर्ण करून तो वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. हा रस्ता वर्दळीचा असून ये-जा करणाऱया वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अडथळे वाहनधारकांना धोकादायक ठरत आहेत.

ढिगारे हटवून रस्ता मोकळा करा

बीएसएनएल कार्यालयाशेजारील मोबाईल केबल घालण्यासाठी रस्त्याशेजारी खोदाई करण्यात आली आहे. खोदण्यात आलेली माती मुख्य रस्त्यावर टाकण्यात आली आहे. त्यामुळे रस्त्यावर मातीचा ढिगारा साचला आहे. हे काम सुरू असल्याने वाहनधारकांनादेखील अडचण निर्माण झाली आहे. याबाबत चौकशी केली असता मोबाईल केबल घालण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. हे काम पूर्ण झाल्यानंतर गटारी केल्या जाणार आहेत. रस्ता करताना हे काम का पूर्ण करण्यात आले नाही? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत असून रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मातीच्या ढिगाऱयांमुळे वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. मातीचे ढिगारे हटवून वाहतुकीसाठी रस्ता लवकर मोकळा करावा, अशी मागणी होत आहे.

Related Stories

पोलीस भरती फसवणूकप्रकरणी गोकाक तालुक्यातील दोघांना अटक

Amit Kulkarni

किटऐवजी बँक खात्यावर रक्कम जमा करा

Amit Kulkarni

लाठीहल्ला करणाऱ्यांवर कारवाई करा

Amit Kulkarni

कॅन्टोन्मेंट निवडणूक जुलैमध्ये शक्य

Patil_p

साईराज वॉरियर्स, डीके लायन्स संघांचे धमाकेदार विजय

Amit Kulkarni

कृष्णा-मलप्रभा नदीवर धोकादायक पाणीपातळी दाखविणारी यंत्रणा

Patil_p