Tarun Bharat

आता जिल्हय़ाला रोज होणार 27 टन ऑक्सिजन पुरवठा

प्रतिनिधी/ बेळगाव

जिल्हय़ामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता बेळगाव जिल्हय़ाला दररोज 27 टन ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे, अशी माहिती व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ऑक्सिजन वितरणाचे राज्य नोडल अधिकारी मुनिष मोदगील यांनी दिली आहे.

याबाबत जिल्हय़ातील नोडल अधिकाऱयांना त्यांनी सूचनाही केल्या आहेत. ऑक्सिजन पुरवठय़ामध्ये कोणताही व्यत्यय येवू नये तसेच ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्या दूर करुन रुग्णांना योग्य प्रकारे ऑक्सिजन पुरवठा करावा, अशी सूचनाही मुनिष मोदगील यांनी दिली आहे.

ऑक्सिजन उपलब्ध नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी प्राधान्य दिले आहे. बेळगाव जिल्हय़ामध्ये रुग्ण वाढले आहेत. बऱयाचवेळा ऑक्सिजन नाहीत अशा तक्रारी येत आहेत. यापूर्वी 24 टन ऑक्सिजन पुरवठा केला जात होता. मात्र त्यामध्ये वाढ करुन आता 27 टन ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अधिकाऱयांना सांगितले आहे.

Related Stories

विठ्ठल हलगेकर यांचा प्रचारसभांचा धडाका

Sandeep Gawade

राजधानीचा विमानप्रवास सुसाट

Amit Kulkarni

राज्यस्तयरीय कुस्ती स्पर्धेसाठी रवळनाथ कणबरकरची निवड

Amit Kulkarni

डुक्कर बंदोबस्त : मच्छेत आंदोलन छेडणार

Amit Kulkarni

अति तेथे माती, फिरली दैवगती!

Amit Kulkarni

कणकुंबी माउलीदेवी यात्रोत्सव आजपासून

Amit Kulkarni
error: Content is protected !!