Tarun Bharat

आता डेन्मार्कमध्ये रोबोटच्या मदतीने होणार कोरोना चाचणी

Advertisements

कोपनहेगन : जगाला कोरोनाच्या विळख्याने बंदीस्त केले जात असताना त्यामधून बाहेर कसं पडायचं याच्या शोधासाठी जगभरातील संशोधक अहोरात्र काम करीत आहेत तर दुसऱया बाजूला कोरोनाचा संसर्ग कमीत कमी होण्याच्या दिशेने काम करीत आपला दैनंदिन प्रवास कायम करण्यावर काही देश काम करीत असल्याचे समोर येत आहे. यांच्यासाठी सध्या मात्र मानवाच्या मदतीला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने काहीसा दिलासा मिळत आहे. आता कोपनहेगन डेन्मार्कमधील कोरोनाच्या युद्धासाठी लढण्यास रोबोटला सज्ज करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. कोरोनाचे संसर्गजन्य रुग्ण शोधण्यासाठी आता ऑटोमेटीक रोबोटची निर्मिती केली असल्याची न्यूज एजन्सी एएफपीच्या माहितीमधून युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न डेन्मार्क यांनी दिली आहे. एकटा रोबोट हा कोरोना रुग्णाची चाचणी करण्याचे काम करण्यास सक्षम असल्याचे यावेळी उपलब्ध माहितीमधून समोर आले आहे.

Related Stories

यशाची गुरुकिल्ली

Patil_p

आर्चीचे नवे रूप

Patil_p

सूर्यनमस्कार एक परिपूर्ण व्यायाम

Patil_p

चायनिजपासून सावधान !

tarunbharat

क्रोध हा खेदकारी

Patil_p

पत्रं हरवू लागलीत…!

Ganeshprasad Gogate
error: Content is protected !!