Tarun Bharat

आता तरी सावध व्हा,आणि खटाव तालुक्यात कोरोना झपाटय़ाने वाढत आहे,

वार्ताहर/ पुसेगाव

गेल्या चार महिन्यांपासून पोलीस ,आरोग्य व स्थानिक प्रशासन कोरोना रोखण्यासाठी जीवाची बाजी लावत होते,  वारंवार  सूचना करूनही लॉक डाऊन च्या काळात नागरिक योग्य ती काळजी घेताना दिसले नव्हते,त्याचाच परिणाम आता दिसून येत आहे,मुंबई-पुणे व अन्य भागातून आलेल्या नागरिकांनी सतत खरेदीच्या निमित्ताने गर्दी केल्यानेच खटाव तालुक्यात कोरोना ने पाय पसरायला सुरुवात केली  आहे.वडूज सारख्या मोठया शहरात कोरोना बाधित रुग्ण सापडला आहे,

कोरोनाबाधितांची संख्या वाढू नये, त्याला त्वरीत आळा घालता यावा, यासाठी तालुक्यातील पुसेगाव सह मोठय़ा  लोकसंख्यची गावे स्वयं स्फूर्ती ने बंद करण्याचा निर्णय  घेण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.आता कुणाची वाट पाहत आहात, वेळे च्या मर्यादेत पेक्षा मंडई,तसेच अन्य दुकाने चालू राहत आहेत कोणाचा निर्बंध नाही,कायद्याची भीती नाही,तोंडाला मास्क नाही की दुचाकी चारचाकी वाहतुकीत बदल नाही त्यामुळे लॉक डाऊन वाढविण्याची मागणी नागरिकांच्यातून होत आहे.

           गेल्या काही दिवसांपूर्वी खटाव तालुक्यातील खरशिंगे(औंध) येथे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता आता या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.  मायणी ,गारवडी(डिस्कळ),चिंचणी ,कातरखटाव, गादेवाडी ,राजाचे कुर्ले,, निमसोड, वांझोळी आणि अशा  कित्येक गावात  कोरोना पोझीटीव्ह रुग्ण सापडले. रुग्णाची दिवसेंदिवस या ग्रामीण भागात झपाटय़ाने  वाढ  होत आहे . आता खटाव तालुक्यात कोरोना बधितांची संख्या 92 तर नुसत्या पुसेगावात  हाय रिस्की रुग्णांची  एकूण संख्या 34 आहे यात पुसेगावतील 9,निमसोड चे 10,कातरखटाव चे 15 संशयित रुग्ण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल आहेत.  तालुक्यातील मायणी व इतर सेंटर फुल्ल भरल्याने पुसेगावात रुग्ण आणले जात आहेत,दहिवडी,म्हसवड याही सेंटरची क्षमता पूर्ण होत  आली आहे,कदाचित उद्यापासून खटाव सेंटर मध्ये रुग्ण दाखल करावे लागणार आहेत. 

  आता मात्र कायदा राबविण्याची गरज दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढू नये, त्याला त्वरीत आळा घालता यावा, यासाठी हा निर्णय प्रशासनाने घेण्याची वेळ आल्याचे चित्र आहे.

राजस्थानमधील भिलवाडामध्ये ज्या प्रमाणे पूर्णपणे लॉकडाऊन करून कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात आले. तसेच खटाव तालुक्यात आता करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील सर्व गावांमध्ये मुंबई व इतर ठिकान्याहून  आलेल्या रुग्णांनी योग्य तपासणी करणे गरजेचे झाले आहे, काही लोक आपली हिस्ट्री लपवत असल्याचे ही जाणवत आहे, प्रत्येकाची घरोघर जाऊन तपासणी करणे, ही तपासणी किमान तीन वेळा करणे, या तपासणीसाठी वेगळ्या टीमने काम करून ज्या नागरिकांना सर्दी, ताप आणि खोकल्याची लक्षणे आढळतील, त्यांच्यावर विशेष लक्ष वैद्यकीय पथकांमार्फत दिले जावे. सर्व जीवनाश्यक वस्तू लोकांनी दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षाही त्यांना घरपोच पुरविण्याची व्यवस्था करणे, अशा उपायांचा भिलवाडा पॅटर्नमध्ये समावेश आहे. यावरती उपाययोजना म्हणून आपली जवाबदारी समजून तालुक्यातील नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून, घराबाहेर न पडता घरात राहून आपापली कामे करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. विनाकारण रस्त्यावर कोणीही न येता पोलिस प्रशासनावर विनाकारण ताण येऊ नये याची काळजी नागरिकांनी घेत प्रशासनास सहकार्य करण्याची वेळ आली आहे.गावातील दुकाने निर्धारीत वेळेपेक्षा जास्त काळ सुरू राहत आहेत याकडे प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही,लोकांच्यात कोरोना बाबत दोन महिन्यांपूर्वी असलेली भीती नाहीशी झाली असल्याचे दिसून येत असल्ल्यानेच कोरोना वाढतो आहे असेच चित्र मोठय़ा गावात दिसत आहे.

           कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढू नये, यासाठी राज्य सरकार व स्थानिक प्रशासन सर्वतोपरी उपाययोजना करीत होते,त्या सध्या दुर्लक्षित होताना दिसत आहेत.   परंतू खटाव तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर होत असलेला कोरोनाचा शिरकाव पाहता सतर्कता दर्शवून तालुक्यातील प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन संपूर्ण खटाव तालुक्यात ’भिलवाडा पॅटर्न’ राबविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related Stories

म्हसवडच्या श्री सिद्धनाथ जोगेश्वरीचे अतिकडक एका पायावरचे “उभ्या नवरात्राचे व्रत” सुरु

Omkar B

नागरिकत्व विरोधात साताऱयात भव्य मोर्चा

Patil_p

मंत्री उदय सामंत यांचा निर्णयांचा धडाका

Patil_p

आंबेघर, मिरगाव अन् ढोकावळेचे कायमस्वरूपी पुनर्वसन करणार

datta jadhav

महाबळेश्वर येथे विदयार्थीनीच्या धाडसामुळे बलात्कारी मुख्याध्यापक गजाआड

Archana Banage

कराड तालुक्यातील चौघे कोरोनामुक्त

Archana Banage