Tarun Bharat

आता तहसील कार्यालयाच्या परिसरातील हॉटेलवाला करु लागला पे ऍण्ड पार्क

Advertisements

सेव्हन स्टारच्या पे ऍण्ड पार्कवर नेत्यांच्या कार्यकर्त्यांची कमाई

प्रतिनिधी/ सातारा

साताऱयात नेत्यांच नाव वापरुन मोकळय़ा जागांवर डल्ला मारणारे अनेक आहेत. नेत्यांचे कार्यकर्तेच वर कमाईतून गब्बर होताना दिसत आहेत. त्यापैकी सेव्हन स्टार इमारतीतील पे ऍण्ड पार्किंग. हे पार्किंग अनाधिकृत असून तिथल्या व्यापाऱयांनाच पार्किंग चालत असल्याने सातारकरांच्या खिशाला कात्री लागत आहे. आता तर चक्क तहसील कार्यालयाच्या समोरील हॉटेलवाल्याने आपल्या मोकळय़ा जागेत पे ऍण्ड पार्क सुरु केले आहे.

सातारा शहरात वाहन उभे करण्यासाठी जागाच शिल्लक नाही. अगदी राजवाडय़ाच्या मोती चौकातल्या सदाशिव पेठेपासून ते पोवई नाक्यावरील कासट मार्केपर्यंत. तहसील कार्यालयापासून ते हुतात्मा स्मारकापर्यंत. शहरात ज्या मोकळय़ा जागा आहेत त्या जागेवर अतिक्रमणे पटकन रात्रीत केली जातात. दुसऱया दिवशीही काहीच कळत नाही. नेत्यांच्या नावाने कार्यकर्त्यांची हप्तेबाजी अतिक्रमण करणाऱयांकडे सुरु असते. कार्यकर्ते काहीच कार्य न करता मोठमोठी वाहने कशी फिरवतात त्याचे गमक येथेच दडलेले आहे. सातारा शहरात सेव्हन स्टारचे पे ऍण्ड पार्किंग सुरु आहे. हे पे ऍण्ड पार्किंग चुकीच्या पद्धतीने आहे. व्यवसायिकांना या पार्किंगची काहीच अडचण वाटत नाही. या इमारतीत जेवढी मोकळी जागा होती. त्या मोकळय़ा जागेवर पे ऍण्ड पार्क केले आहे. तळमजल्यात चार चाकींचे पे ऍण्ड पार्क केले असल्याने आयताच गल्ला जमवण्यासाठी राजेंचे काही टपोरे कार्यकर्ते कार्य करत आहेत. सातारा तहसील कार्यालयाच्या परिसरात खाजगी वाहनांना बंदी केली आहे. त्यामुळे बाहेर वाहनांची गर्दी होत होती. समोरच्या असलेल्या एका हॉटेलवाल्याने वाहनधारकांची होत असलेली गर्दी पाहून पे ऍण्ड पार्क सुरु केले आहे. त्यामुळे नव्या व्यवसायात त्या हॉटेल चालकाची चांगलीच उदभरणी सुरु आहे.

Related Stories

सातारा : गावकारभाऱ्यांनो मिळालेल्या संधीचं सोनं करा – जितेंद्र भोसले

datta jadhav

महामार्ग ओलांडणाऱया बिबटय़ाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

Patil_p

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचे निधन

Rohan_P

पाटोळ खडकीत 6 पॉजिटिव रुग्ण सापडल्याने खडकीची संख्या 8

Patil_p

नगरपालिकेचा तयार झाला सुशोभीकरण प्लॅन

Patil_p

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde
error: Content is protected !!