Tarun Bharat

आता दोनच दिवसांचे विकेंड लॉकडाऊन

शनिवार आणि रविवारी व्यवहार राहणार बंद

प्रतिनिधी/ बेळगाव

कोरोना थोपविण्यासाठी कडक विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. मागील आठवडय़ामध्ये शुक्रवारपासून सोमवारी पहाटेपर्यंत तीन दिवसांचे लॉकडाऊन होते. मात्र आता रुग्णसंख्या कमी झाल्याने या आठवडय़ात विकेंड लॉकडाऊन दोन दिवसांचे राहणार आहे. शनिवार दि. 12 रोजी सकाळी 6 पासून ते सोमवार दि. सकाळी 6 पर्यंत हे लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिले आहेत.

लॉकडाऊनमध्ये एक दिवस कमी करण्यात आला असला तरी नागरिकांना याबाबत गांभीर्य पाळणे गरजेचे आहे. काही प्रमाणात रुग्णांचा आकडा कमी झाला आहे. म्हणून कोणीही बेजबाबदार वागू नये. कोरोनाचे नियम प्रत्येकाने पाळावे. दोन दिवस मात्र अत्यंत कडक लॉकडाऊन पाळावा, असे जिल्हाधिकाऱयांनी या आदेशात म्हटले आहे.

या लॉकडाऊन काळात दूध, औषधे, ऑनलाईन अन्नसेवा, हॉस्पिटल्स वगळता इतर कोणत्याही व्यवसायाला परवानगी राहणार नाही. तेव्हा याची प्रत्येकाने दखल घ्यावी आणि जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. महत्त्वाचे म्हणजे स्वतःचे आणि समाजाचे हित प्रत्येकाने जपण्याची ही वेळ आहे. तेव्हा कोरोनाचे नियम प्रत्येकाने पाळावेत. आता रुग्णांची संख्या कमी होत आहे म्हणून नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

गेल्या 15 दिवसांमध्ये रुग्णसंख्येत अधिक पट्टीने वाढ झाली होती. दररोज हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. याचबरोबर मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाली होती. त्यामुळे राज्य सरकारने कठोर निर्बंध घातले होते. त्या निर्बंधाची अंमलबजावणी करण्यात आली होती. मात्र तरी देखील काही जण विनाकारण फिरताना दिसत होते. हे अत्यंत चुकीचे आहे. कारण आपल्या चुकींमुळे इतरांना त्रास होतो. आता विकेंड लॉकडाऊनमध्ये एक दिवसाची कपात करण्यात आली आहे. पण कोणीही कपात झाली म्हणून बेजबाबदारपणे वागू नये, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

Related Stories

वजन कमी करण्याच्या नादी, जीव सांभाळावा आधी!

Amit Kulkarni

संवेदनशील भागावर पोलिसांचे विशेष लक्ष

Amit Kulkarni

कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्याने अपार्टमेंट परिसर केला निर्जंतकीकरण

Patil_p

स्पोर्ट्स ऑन, सुपर एक्स्प्रेस युनियन जिमखाना संघ विजयी

Amit Kulkarni

महिला मंडळ महिलांचे हक्काचे व्यासपीठ

Patil_p

रेल्वे स्थानकाला डॉ. शिवबसव स्वामीजींचे नाव द्या

Patil_p