Tarun Bharat

आता प्रत्येक तालुक्यातच कोरोना रुग्णांवर उपचार

Advertisements

‘सिव्हिल’वरील ताण कमी करण्यासाठी प्रयत्न

प्रतिनिधी / बेळगाव

कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलवर अधिक ताण पडत आहे. त्यासाठी आता त्या त्या तालुक्यातच कोविड रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. त्यासाठी आरोग्य विभागाला सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी दिली आहे.

काही संस्थांनी कोविड सेंटर सुरू केली आहेत. त्या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करणाऱयांवर निर्बंध का घालण्यात आले असे विचारता, खासगी कोविड सेंटरना किंवा घरी जाऊन ऑक्सिजन देणे हे बेकायदेशीरच आहे. कायद्यामध्ये तशी कोणतीच तरतूद नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिल्हा प्रशासन पूर्ण ताकदीनीशी रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे कोणीही जिल्हा प्रशासनाबद्दल गैरप्रचार पसरवू नये, असे त्यांनी आवाहन केले.

ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून अनेकजण तक्रारी करत आहेत. मात्र, त्या योग्य नाहीत. कारण ऑक्सिजन सिव्हिल व खासगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी आमचे नेहमीच प्रयत्न आहेत. मात्र, सोशल मीडियावर गैरसमज पसरविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यामुळे समस्या निर्माण होत असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. आता प्रत्येक तालुक्यातच कोविड सेंटर उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे निश्चित त्या ठिकाणी रुग्णांवर उपचार होणार आहेत. त्यामुळे बेळगाव शहरावरील ताण कमी होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

बेकिनकेरे तलाव धोकादायक स्थितीत

Amit Kulkarni

आरपीडी चौकातील खोदाईमुळे देशमुख रोड बंद

Amit Kulkarni

बेळगावात घरफोडय़ा करणाऱया जोडगोळीला अटक

Amit Kulkarni

केवळ ठराव करुन सीमा प्रश्न सुटणार नाही

mithun mane

तालुक्याच्या पूर्वभागात ऊस बांधणी कामाला वेग

Amit Kulkarni

सिव्हिल हॉस्पिटल कोरोना रुग्णांनी तुडुंब

Patil_p
error: Content is protected !!