Tarun Bharat

आता फोनवर बोलने ही झाले महाग

मोबाईल रिचार्ज मध्ये झाली भरघोस वाढ

प्रतिनिधी/ सातारा

 सध्या महागाईची झळ सर्वत्रच जाणवू लागली आहे, त्यातच आता प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्त्यंत महत्वाचा भाग असणाऱया मोबाईलच्या रिचार्ज मध्ये ही वाढ झाली आहे. त्यामुळे आता फोनवरून बोलने महागात पडत आहे. त्यातच आता शालेय विद्यार्थ्यां पासुन ते सर्वांनाच मोबाईल हा अत्यावश्यक झाला आहे, त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित आणखीनच कोलमडुन जाणार आहे. 

 सध्या मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने, एअरटेल, व्होडाफोन, आयडीया प्रमाणे प्रिपेड प्लॅन्समध्ये भरघोस वाढ करण्यात आली आहे. जवळपास 20 टक्यांनी वाढ करण्यात आली आहे. सदरची वाढ ही दि. 1 डिसेंबर पासून करण्यात आली असुन एकुण 480 रूपयांपर्यंतची ही वाढ झाल्याने ही दरवाढ पाहता ग्राहकांच्या भुवया चांगल्याच उंचाविल्या आहेत.

 ग्राहकांना आकर्षित करण्याकरीता अनेक कंपन्यांतर्फे मोफत किंवा अल्पदरात सिम कार्ड देऊन ग्राहकांना चांगलेच आकर्षित करण्याचा फंडा आजमिला होता. त्यातच आता अधिक प्रमाणात खरेदी करणाऱयांवर ही केंद्र शासनाची करडी नजर असणार आहे. त्यामुळे आपला मोबाईल नंबर सुरू राहण्याकरीता रिचार्जच्या दरात वाढ जरी झाली असली तरी अधिक रक्कम ही मोजावीच लागणार आहे. त्यातच येत्या काही दिवसात 5 जी ची सुविधा आल्यानंतर हे दर आणखीन वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 पालकांना सर्वाधिक फटका

 कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ऑनलाईन शिक्षण पध्दत सुरू करण्यात आली होती. यामुळे अनेक पालकांना आपापल्या पाल्यांना नाईलाजास्तव अत्याधुनिक फोन घेऊन द्यावे लागले होते. त्यातच एका पेक्षा अधिक दांपत्य असणाऱयांना तर प्रत्येक मुलांना विविध असे फोन घेऊन द्यावे लागले होते. कारण प्रत्येकाची ऑनलाईन शिक्षणाची वेळ एकच असल्याने आपल्या पाल्याचे नुकसान होऊ नये म्हणून पालकांनी हे मोबाईल घेऊन दिले होते. सध्या शाळा जरी सुरू झाल्या असल्या तरी ऑनलाईनच्या माध्यमातुन ही शिक्षण पध्दत सुरूच आहे, त्यामुळे या रिचार्ज दरावाढीचा फटका पालकांना सर्वाधिक प्रमाणात बदसत आहे.

Related Stories

ऑक्सिजनसाठी ‘सोना अलॉयज्’ला 24 तासात मंजूर केला अतिरिक्त वीजजोडभार

Patil_p

होम आयोलेशनमधील रुग्ण घराबाहेर दिसला की होणार कारवाई

Patil_p

रेशनचे धान्य काळ्या बाजाराने विकत घेणायाना अटक करा:बाळासाहेब शिंदे

Patil_p

साताऱ्यातील म्हसवडकर एजन्सीसह देशात एकाच वेळी ६०० किसान समृद्धी केंद्रांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

Archana Banage

भाजप भावी सहकारी : मुख्यमंत्री ठाकरे

Archana Banage

कास तलावची जुनी साठवण पाणी पातळी पुर्ण; नव्या पातळीकडे वाटचाल

Archana Banage