Tarun Bharat

आता बूस्टर डोसवर सरकारचे लक्ष

अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार 10 एप्रिल 2022, दुपारी 12.00

● दोन वर्षांनंतर अभूतपूर्व उत्साहात रामनवमीला सुरुवात
● शनिवारी दिवसभरात 171 जणांचे स्वॅब तपासणी
● जिल्ह्यात नव्याने 2 जण बाधित
● जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी 1.17 वर

सातारा / प्रतिनिधी :

कोरोना हटवण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. त्यासाठी शासन पातळीवर लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्ह्यात लसीकरण चांगले झाले असून, आता बूस्टर डोसवर सरकारचे लक्ष आहे. जास्तीत जास्त बूस्टर डोस कसे देता येतील यासाठी आरोग्य विभागाच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, दोन वर्षानंतर रामनवमीचा उत्साह पहायला मिळत आहे. गावागावात रामनवमी निमित्ताने शोभयात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सकाळी जाहीर झालेल्या अहवालात नव्याने 2 जण बाधित आढळून आले असून, शनिवारी दिवसभरात 171 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 1.17 वर आहे.

बूस्टरवर आता सरकारचा जोर

कोरोनाला हरवायचे असेल तर लसीकरण महत्वाचे आहे असे शासन सांगते आहे. त्यानुसार पहिल्या लसीकरण नुकतेच सुरू झाले त्यावेळी नागरिकांनी जसे नळाच्या पाण्यासाठी रात्रभर रांगा लावतात तसे रात्रभर जागून लसीकरण केंद्राबाहेर नंबर लागलेले असायचे. काहींनी त्यावेळी गर्दीत मारामारीही केली. काहींनी वशिल्याने लस घेतली तर काहींनी विकत टोचून घेतले. सातारा जिल्ह्यात लसीकरण चांगल्या पद्धतीने राबवण्यात येत आहे. चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता सरकारने बूस्टर डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवले असून आरोग्य विभागातून तशा हालचाली सुरू आहेत.

दोन वर्षानंतर रामनवमीला अलोट उत्साह

रामनवमी या सणाच्या अनुषंगाने गेली दोन वर्षे कोरोनामुळे कडक निर्बंध होते. उत्साह साजरा करता येत नव्हता. मंदिरे कुलूपबंद होती. आता कोरोनाचे निर्बंध शिथील झाल्याने यावर्षी गावागावात रामनवमी निमित्ताने प्रभू श्रीरामाची मंदिराना आकर्षक विधूत रोषणाई करण्यात आली आहे. शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून अभूतपूर्व उत्साह पहायला मिळत आहे.

जिल्ह्यात नव्याने दोन जण बाधित

जिल्ह्याचा रविवारी सकाळी जाहीर करण्यात आलेला अहवाल पहाता शनिवारी दिवसभरात 171 जणांचे स्वॅब तपासणी करण्यात आले असून, त्यात 2 जण नव्याने बाधित आढळून आले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 1.17 टक्के आहे.

रविवारी
नमुने-171
बाधित-02

रविवारपर्यंत
नमुने-25,74,663
बाधित-2,79,221
मृत्यू-6,683
मुक्त-2,71,828

Related Stories

पावसाच्या आगमनाने नागरिकांची उडाली दैना

Patil_p

सातारा : शेतकऱ्यांनी फसव्या बातम्यांना बळी पडू नये

Archana Banage

दारू पिऊन घर पेटवणाऱयाला 3 वर्ष सक्तमजुरी

Patil_p

पोलिसांवर दरोडेखोरांचा गोळीबार; सुदैवाने बचावले API लांडे

datta jadhav

अंगणवाडी सेविकांनी केली मोदींकडे ‘धन की बात’

Patil_p

घोटाळय़ातील 45 लाख रुपये जिल्हा परिषद प्रशासन वसुल करणार

Patil_p