Tarun Bharat

आता बेकायदा साईनबोर्ड, पोस्टर, बॅनर, होर्डिंग्सवर कारवाई

मडगाव पालिका मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी दिलेली माहिती : विशेष पथक स्थापणार

प्रतिनिधी /मडगाव

मडगाव पालिका मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी थकबाकी वसुलीसाठीची मोहीम तीव्र गतीने सुरू ठेवताना आता आणखी एक काम हाती घेतले आहे. यावेळी अनधिकृतरीत्या साईनबोर्ड, पोस्टर्स, बॅनर आणि होर्डिंग्स उभारणाऱयांवर कारवाई करण्याचे त्यांनी ठरविले आहे.

मडगावच्या सक्रिय नागरिकांच्या यासंदर्भातील तक्रारींची आपण दखल घेतली आहे. काही विपेते आणि दुकानदार रातोरात होर्डिंग्स आणि साईनबोर्ड उभारतात, जे एक तर रहदारीचे दृष्य दिसण्यापासून रोखतात किंवा मंजुरीशिवाय वा पालिकेला आवश्यक कर न भरता हे बेकायदा कृत्य केले जाते असे आढळून आले आहे. अनेक प्रकरणांमध्ये आता पालिका अधिकाऱयांच्या लक्षात आले आहे की, होर्डिंग्स आणि साईनबोर्ड बसविण्यासाठी परवानगी घेऊन नियमांचे परस्पर उल्लंघन केले जाते. आकार आणि इतर बाबी न पाळता मोठे फलक उभारतात. पालिकेकडून परवाना देताना मंजूर केलेले मापदंड ठोकरले जातात असे नजरेस आल्याचे मुख्याधिकाऱयांनी सांगितले आहे.

पालिकेला व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांनी अनधिकृतरीत्या पोस्टर्स, साईनबोर्ड आणि होर्डिंग्स उभारल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हे प्रतिस्पर्धी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अडथळा आणतात आणि अशा घटनांमुळे दुकानमालकांमध्ये वाद निर्माण झालेला आहे. अशांवर कठोर कारवाई केली जाईल आणि असे बेकायदेशीर होर्डिंग्स खाली खेचण्याची किंमत पालिका नियमांचे उल्लंघन करणाऱयांकडून आकारेल, असेही मुख्याधिकाऱयांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आपण एक विशेष पथक स्थापन करेन, जे अशा उल्लंघन करणाऱया आस्थापनांना भेट देईल आणि साईनबोर्ड व होर्डिंग्सचे मोजमाप घेईल. नियमांनुसार नसल्यास ते कारवाई करेल, असे मुख्याधिकाऱयांनी सांगितले. पुराव्यांसाठी आवश्यक चित्रीकरण केले जाईल. दुकान किंवा कार्यालयाने परवानगी घेतल्यानंतर साईनबोर्ड आणि होर्डिंग्सवर परवाना क्रमांक प्रदर्शित करणे अनिवार्य असल्याचे मुख्याधिकाऱयांनी नजरेस आणून दिले.

व्यापार परवाना न घेणाऱयांविरुद्ध कडक धोरण

दरम्यान, 1 नोव्हेंबरपासून पालिकेद्वारे अधिकृत व्यापार परवाना न घेता पालिका क्षेत्रात व्यवसाय करणाऱया व्यावसायिक?ांविरुद्ध कडक धोरण हाती घेतले जाईल, असा इशारा मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी दिला आहे. नागरिकांना आणि व्यावसायिकांना करभरणा करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीचा लाभ घेण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. दरम्यान, सध्या मडगाव पालिकेची थकबाकी वसुली मोहीम जोरात चालू असून त्याच्या अंतर्गत गुरुवारी 8 लाख रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Related Stories

कदंब पठारावर पर्यटकाला लुटले

Amit Kulkarni

पेडणे पालिका नगराध्यक्षपदी उषा नागवेकर तर उपनगराध्यक्षपदी मनोज हरमलकर यांची बिनविरोध निवड

Amit Kulkarni

”निवडणुकीसाठी टॅक्सी पुरविणाऱ्या महाराष्ट्राच्या कंपनीचे कंत्राट रद्द करा”

Abhijeet Khandekar

म्हादईवर विरोधकांनी सावध व्यक्तव्ये करावीत

Amit Kulkarni

कोरोना नियमावलीचे कठोरतेने पालन करा

Amit Kulkarni

वांते डोंगरकडा सत्तरी येथील रस्त्याचे काम अर्धवट बंद

Patil_p