Tarun Bharat

आता भारत सरकारचे माजी अ‍ॅटर्नी जनरल मांडणार आर्यन खानची बाजू

मुंबई/प्रतिनिधी

मुंबई ड्रग्ज प्रकरणात (mumbai drug case) अटकेत असलेल्या आर्यन खानला (Aryan Khan) सोडवण्यासाठी शाहरुख खान सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आर्यनला जमीन मिळावा यासाठी शाहरुख खानने पुन्हा एकदा वकील बदलला आहे. १ नोव्हेंबरपासून न्यायालये दिवाळीमुळे सुट्टी असताना बंद राहणार आहेत. पुढचे दोन आठवडे न्यायालय बंद राहणार असल्यामुळे या तीन दिवसांत आर्यन खानला जामीन न मिळाल्यास त्याचा आर्थर रोड जेलमधला (arthur road jail) मुक्काम थेट १५ नोव्हेंबरपर्यंत वाढू शकतो. त्यामुळे आर्यनला जमीन मिळावा यासाठी आता भारत सरकारचे माजी अ‍ॅटर्नी जनरल आर्यनची बाजू मांडणार आहेत. मुकुल रोहतगी (Mukul Rohatgi Former Attorney-General for India) यांच्याकडे आर्यन खानचं वकीलपत्र सोपवण्यात आलं आहे. आज उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

आर्यन खानला अजूनही जामीन मिळत नसल्यामुळे त्याचा तुरुंगातला मुक्काम दिवसेंदिवस वाढतच आहे. एनडीपीएसच्या विशेष न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आता आर्यन खाननं जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे आता तरी आर्यन खानला जामीन मिळणार का? असा प्रश्न निर्माण झालेला असताना शाहरुख खान मात्र आपल्या मुलाला सोडवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करताना दिसत आहे. वकील अमित देसाई आणि सतीश मानेशिंदे यांच्यानंतर शाहरुखने आर्यनची कोर्टात बाजू मांडण्यासाठी थेट भारत सरकारचे माजी अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांची नियुक्ती केली आहे. आत ते आर्यन खानची बाजू मुंबई उच्च न्यायालयात मांडणार आहेत.

केंद्र सरकारचे माजी अ‍ॅटर्नी जनरल अर्थात एजीआय मुकुल रोहतगी मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानची बाजू मांडणार आहेत. आज उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. २० ऑक्टोबर रोजी विशेष न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या सुनावणीमध्ये त्याची ३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी कायम केली होती. त्यामुळे आर्यन खानचा आर्थर रोड जेलमधला मुक्काम वाढला होता.

Related Stories

हिरो मोटोकॉर्पचे प्रमुख पवन मुंजाल यांच्या ठिकाणांवर आयकरची छापेमारी

datta jadhav

लक्ष्मण माने, घरतांवर गुन्हा दाखल होण्यासाठी आंदोलन

Patil_p

लॉकडाऊनची मुदत 15 मे पर्यंत वाढवली

Archana Banage

माणगाववाडीत हातभट्टीचे निर्मिती केंद्र उद्धवस्त

Archana Banage

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर भरदिवसा गोळीबार; प्रकृती गंभीर

Archana Banage

सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात कोरोना योद्धयांचा गौरव

Tousif Mujawar