Tarun Bharat

आता ‘या’ राज्यात 31 डिसेंबर ते 1 जानेवारी पर्यंत नाईट कर्फ्यु

ऑनलाईन टीम / जयपूर : 


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राजस्थान सरकार अधिक सतर्क झाली आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित कार्यक्रमांमुळे कोरोना व्हायरस अधिक वाढण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थान सरकारने आयोजित कार्यक्रम रद्द केले असून, प्रदेशातील ज्या ज्या शहरात एक लाख पेक्षा अधिक लोकसंख्या आहे, अशा शहरांमध्ये 31 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान, नाईट कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेतला आहे. 


राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार, राज्यात 31 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते 1 जानेवारी रोजी सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यु जारी करण्यात आला आहे. सरकारच्या आदेशानुसार, ज्या शहरात 1 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या आहे, तेथे हा कर्फ्यु लावण्यात आला आहे. 


यामध्ये राजधानी जयपूर, जोधपूर, कोटा, उदयपूर, अजमेर, बिकानेर, भिलवाडा, नगौर, पाली, टोंक आदी शहरांमध्ये नाईट कर्फ्यु असणार आहे.

Related Stories

गोमातेसाठी मध्यरात्री खुले झाले द्वारकाधीशाचे द्वार

Amit Kulkarni

एसबीआय गृहकर्जावर प्रक्रिया शुल्क माफ

Patil_p

गृहमंत्र्यांच्या दौऱयापूर्वी काश्मीरमध्ये कारनामे

Patil_p

गणेश नाईक यांना कोणत्याही क्षणी अटक

datta jadhav

‘आरोग्य’साठी अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची तरतूद करा

Abhijeet Khandekar

भूपेंद्र पटेल गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी घेणार शपथ

Archana Banage