Tarun Bharat

आता युद्ध पेटलं! चंद्रकांत पाटलांचाही मुख्यमंत्र्यांना इशारा

Advertisements

तरुण भारत ऑनलाइन टीम

कोल्हापूर- आता युद्ध पेटलं आहे. इथून पुढे आमच्या केसेस काढणार, आम्हाला शिव्या घालणार, खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाणार. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना पुराव्याशिवाय बोलू नये, आपली पातळी सोडू नये. अशा सक्त सूचना दिलेल्या आहेत. अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रतिक्रियेवर त्यांनी हे उत्तर दिले आहे.
पुढे चंद्रकांत पाटील म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या अशा धमक्यांना आम्ही घाबरणार नाही. गेल्या 28 महिन्यात अनेक धमक्‍या दिल्या आहेत. अशा धमक्यामुळ तुमची प्रकरण काढणं थांबवणार नाही. असा इशाराच चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.

जयंत पाटील तुम्ही काय करायचं ते करा.


जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी, कोणती प्रकरण दिली आहेत. याची माहिती नाही. याआधी त्यांनी दोन प्रकरणं दिलीत. त्यात ते तोंडावर आपटले आहेत. त्यांना काय करायचं ते करू देत, असे थेट आव्हानच चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांना दिला आहे.

महाविचा जमिनीत इंटरेस्ट


पुणे विमानतळ बाबत बोलताना, चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाबाबत जमीन मिळवली होती. मात्र सरकार बदलल्यानंतर हे काम थांबले. महा विकास आघाडीच्या नेत्यांची इंटरेस्ट जमिनीमध्ये आहे. त्यामुळे त्यांनी विमानतळाची जागा बदलण्याचा प्रयत्न केला, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला.

एफआरफीचे तुकडे होऊ देणार नाही

राज्य सरकारने या पार्टीचे तुकडे केले आहेत. हे तुकडे होऊ देणार नाही. साखर कारखानदारांना राजकीय आश्रय मिळणार नसतील तर असे उद्योग मरून जातील. साखर कारखाना सूतगिरण्या अशा संस्थांना थकहमी मिळाली पाहिजे. असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं. एफआरफी चे दोन तुकडे होऊ देणार नाही. ही मनमानी खपवून घेतली जाणार नाही. अशी प्रतिक्रियाही चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Related Stories

ऊस तोडणीसाठी पैसे घेणाऱ्यांवर होणार कारवाई

Abhijeet Shinde

राधानगरीत होणारा काजवा व पर्यटन महोत्सव सलग दुसऱ्या वर्षी रद्द

Abhijeet Shinde

धामणी खोऱ्यातील वेतवडे पैकी भेंडाई धनगरवाडा गेली २१ दिवस अंधारात

Abhijeet Shinde

गडहिंग्लज कोविड केअर सेंटरमध्ये युवकाची आत्महत्या

Abhijeet Shinde

कोल्हापूर : उच्च न्यायालयाचा महावितरणला दणका

Abhijeet Shinde

जयसिंगपुरातील माने केअर सेंटरमधील डायलिसिस टेक्निशियनला जीवे मारण्याची धमकी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!