Tarun Bharat

आता शाहीनबागमध्ये गोळीबार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठातील गोळीबाराच्या घटनेला 48 तास उलटण्याआधीच शाहीनबागमधील आंदोलनस्थळावर गोळीबार करण्याचा प्रकार घडला आहे. हल्लेखोर युवकाने तब्बल तीन गोळय़ा हवेत झाडल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून पिस्तूलही जप्त केले आहे. त्याची ओळख पटली असून तो दिल्लीतील दल्लूपुरा भागातील असून नाव कपील असल्याचे डीसीपी चिन्मय बिश्वास यांनी सांगितले.

या तरुणाने केलेल्या गोळीबारामध्ये कोणीही जखमी झालेले नसले तरीही नागरिकत्वाविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला होणारा विरोध कडवा होत असल्याचे दिसून येत आहे. दिल्लीतील शाहीनबागमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. शनिवारी या परिसरात युवकाने केलेल्या गोळीबाराने परिसर हादरला. प्रत्यक्षदर्शी शहनवाज याने सांगितले की, गोळीबर करणारा युवक जय श्रीरामच्या घोषणा देत होता. त्याने तीन गोळय़ा हवेत झाडल्या. यावेळी पोलीसही उपस्थित  होते. मात्र तरीही ही घटना घडली. या युवकाने ‘हिंदुस्थानात फक्त हिंदूंचेच राज्य चालेल, अन्य कोणाचेही नाही’ असे वक्तव्य केल्याचेही या प्रत्यक्षदर्शीने म्हटले आहे.

ताब्यात घेण्यात आलेला युवक बारावीमध्ये शिकत असून कोणत्याही संघटनेशी संबंधित नसल्याचे त्याच्या चौकशीत समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शाहीनबागमध्ये सुरु असलेल्या आंदोलनामुळे तो नाराज होता. त्यातूनच त्याने देशी कट्टय़ाच्या मदतीने हवेत गोळीबार केला. त्याला कोणत्याही आंदोलकाला मारायचे नव्हते, त्यांना केवळ घाबरवण्याच्या उद्देशाने हा गोळीबार केल्याचे पोलिसांजवळ कबूल केल्याचे विश्बास म्हणाले. त्याने हा देशी कट्टा कोणाकडून खरेदी केला याची चौकशी पोलीस करत आहेत.

दरम्यान, गुरुवारीही दिल्लीतील जामिया मिलिया परिसरातही नागरिकता विरोधात सुरु असलेल्या आंदोलनावेळी एका युवकाने गोळीबार केला होता. यामध्ये एक विद्यार्थीही जखमी झाला होता. पोलिसांनी त्याला पकडले असून जखमी विद्यार्थ्यावर उपचार करुन त्याला सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरोधात 307 आणि शस्त्र कायद्यानुसार गुन्हा नोंद केला असून तपास दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे, असे दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त प्रवीर रंजन यांनी सांगितले.

Related Stories

प्रेस स्वातंत्र्याच्या निष्कर्षावर केंद्रसरकार सहमत नाही : माहिती आणि प्रसारण मंत्रालय

Abhijeet Khandekar

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 32 हजार पार

Tousif Mujawar

काँग्रेस अध्यक्षांच्या टिप्पणीवरून वाद

Patil_p

सर्वोच्च न्यायालयाकडून मराठा आरक्षण रद्द

Patil_p

दहशतवादी फंडिंगप्रकरणी जबलपूरमध्ये एनआयए छापे

Patil_p

विस्तारवादाचे दिवस गेले, आता विकासवादाचे युग

datta jadhav
error: Content is protected !!