Tarun Bharat

आता शिक्षक विद्यार्थ्यांना कोरोना बाबत उद्भोदक करणार

संभाव्य तिसऱया लाटेचा धोका लहान मुलांवर अधिक असल्याने पुर्व खबरदारी

प्रतिनिधी/ सातारा

 कोरोनाच्या संभाव्य तिसऱया लाटेचा धोका हा लहान मुलांना अधिक असल्याने याची आता जिल्हास्तरावर अधिकतर खबरदारी घेण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकवर्गांना आपापल्या शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोना बाबत मार्गदर्शन करणे, त्याचबरोबर शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे, आदींबाबत मार्गदर्शन विद्यार्थी वर्गांना वेळोवेळी करावे लागणार आहे.

 सध्या सर्व शाळा या ऑनलाईन माध्यमातुन सुरू करण्यात आल्या आहे. विद्यार्थी हे शिक्षकांच्या अधिक संपर्कात असतात. त्यामुळे शिक्षकवर्गांवर ही जबाबदारी सोपाविण्यात आली आहे. कारण आता कोरोनाचा तिसऱया लाटेचा धोका हा लहान मुलांना अधिक असल्याने पुर्व खबरदारी म्हणून ही उपाययोजना करण्यात येत आहे.

 याअनुशंगाने शिक्षकवर्ग विद्यार्थ्यांना कोरोना महामारीबाबत उदभोदक करणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयामध्ये कोणी कोरोना बाधित आहेत का, किंवा विद्यार्थी कोणत्या कोरोना बाधितांच्या संपर्कात आले आहेत का याबाबत माहिती ही संकलीत करावी लागणार आहे. यावर ग्रामदक्षता समितीचे ही यावर नियंत्रण असणार आहे. प्रत्येक गावपातळीवर ग्राम दक्षता समिती स्थापण करण्यात आली आहे. यामध्ये सरपंच हे अध्यक्ष असुन, ग्रामसेवक हे सचिव आहेत. तसेच ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, सोयटीचे सदस्य, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक हे याचे सदस्य आहेत. 

Related Stories

Satyajit Tambe : सत्यजीत तांबे यांच्यावर पक्षाकडून कारवाई; 6 वर्षासाठी निलंबित

Abhijeet Khandekar

राज्यात सरसकट लसीकरण मोफतच

Archana Banage

सातारा : जांभुळणीला रंगणार विनाप्रेक्षक कुस्त्यांचा थरार

Archana Banage

14 दिवसानंतरचा अहवाल निगेटीव्ह

Patil_p

अन्यथा.. दारूची दुकानेही बंद करावी लागतील : आरोग्यमंत्री

Archana Banage

कास पर्यटकांची कार कोसळली दरीत, युवतीचा मृत्यू

Archana Banage