Tarun Bharat

आता संपूर्ण शहरात सर्वेक्षण मोहीम

मनपा, आशा कार्यकर्त्या, बीएलओ, आरोग्य खात्याचे कर्मचारी घेत आहेत माहिती

प्रतिनिधी/ बेळगाव

शहरात प्रत्येक घरोघरी जावून घरी कोणी आजारी आहे का? बीपी, डायबेटीस् किंवा अन्य आजाराने त्रस्त आहेत का? असा तपशील जमा करण्याची मोहिम बीएलओ आणि आशा कार्यकर्त्यासह आरोग्य खात्याच्या कर्मचाऱयांनी सुरू केली आहे. तसेच कुटुंबातील सदस्यांची संख्या घेण्यासह विविध माहिती घेण्यासाठी मनपा कर्मचाऱयांनी सर्वेक्षण सुरू केले आहे.

शहर आणि ग्रामीण परिसरात कोरोना ग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले रूग्ण सापडेल्या परिसराला निर्बधित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र या परिसरात किती नागरिक वास्तव्यास आहेत तसेच किती नागरिक परगावी असतात याची माहिती घेण्यासाठी घरोघरी जावून सर्वेक्षण करण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. मात्र अलिकडे शहराच्या मध्यवर्ती भागात कोरोना विषाणूची लागण झालेले रूग्ण आढळल्याने संपुर्ण शहरातील कुंटूबाच्या सदस्यांची संख्या किती आहे, याचा तपशील घेण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे संभाव्य धोका ओळखून प्रशासने तयारी सुरू केली असून  महापालिकेच्यावतीने ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. यापुर्वी कंटेन्मेंट परिसरात ही मोहिम राबविण्यास प्राधान्य देण्यात आले होते. मात्र आता संपुर्ण शहर आणि उपनगरात ही मोहिम राबविण्यास प्रारंभ करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसापासून शहापूर,वडगाव परिसरात सर्वेक्षण करण्यात येत आहे.

विषाणूचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याने लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येत आहे. घरोघरी जावून नागरिकांची माहिती घेण्यात येत असून त्या तसेच कोरोनाची लक्षणे किंवा सर्दी, खोकला झालेल्या नागरिकांची माहिती आरोग्य खात्याचे कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आणि बीएलओ करीत आहेत. तसेच अशाप्रकारचे रूग्ण आढळल्यास त्याबाबतची माहिती आरोग्य खात्याला  कळवून तपासणी करण्यात येत आहे. कोरोनाची लागण झालेल्या भागात तीन किलो मीटर परिसर निर्बधिंत प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला आहे. कोरोना ग्रस्त रूग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. मात्र शहरातील मध्यवर्ती भागासह अन्य ठिकाणी कोरोना विषाणूची लागण झाल्याचे निदर्शनास आल्याने सर्व परिसरातील नागरिकांची माहिती घेण्यात येत आहे. घरोघरी जावून घरातील सदस्याची संख्या किती? घरी कोणी सदस्य परगावाहून आले आहे का? किवा जावून आला आहे का? याची माहिती घेण्यात येत आहे.तसेच परिसरातील किराणा दुकानांची माहिती घेण्यात येत आहे. ही जबाबदारी महापालिकेच्या वॉर्ड क्लार्कवर सोपविण्यात आली आहे. तसेच घरात कोणी बीपी आणि डायबेटीस् व अन्य आजाराचे रूग्ण आहेत का? याची माहिती घेण्यात येत आहे. परिसर सिल करण्यात आल्यास त्या भागात जीवनावश्यक साहित्याचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच सर्वेक्षण करण्यात आलेल्या घरावर जनजागृती स्टिकर चिकटविण्यात येत आहे. सर्दी, खोकला, ताप आणि श्वासोच्छश्वास घेण्यास अडचण झाल्यास मदतीकरिता हेल्पलाईन क्रमांक स्टिकरवर देण्यात आला असून संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

काकती सिद्धेश्वर मंदिरसमोर गटार तुंबून दुर्गंधी

Amit Kulkarni

कार्तिक काटेचा जितू गुज्जरवर एकलांगीवर विजय

Amit Kulkarni

नवी ऊर्जा घेऊन दौडची सांगता

Patil_p

रबर-फोम शीटच्या मखरांनी सजली बाजारपेठ

Amit Kulkarni

शहरात वाहतुकीची प्रचंड कोंडी

Patil_p

प्राणघातक हल्ल्यात वृद्ध ठार

Tousif Mujawar