Tarun Bharat

आता १२ वी च्या गुणांवरून केंद्रीय विद्यापीठात प्रवेश नाही

ऑनलाईन टीम / तरुण भारत

विद्यापीठ अनुदान आयोग विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेत अऩेक वेगवेगळे निर्णय घेत असते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात कालानुक्रमे अपडेट राहण्यासाठी बदल करत असते याच पार्श्वभुमीवर युजीसीने एक मोठी घोषणा केली असुन यापुढे सर्व केंद्रीय विद्यापीठांसाठी एकच प्रवेश परीक्षा आयोजित करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीने याबाबत अधिकृत घोषना केली असुन यापुढे देशातील केंद्रीय विद्यापीठांमध्ये पदवीला प्रवेश घेताना बारावीला बोर्डात मिळालेल्या गुणांचा फायदा होणार नाही. प्रवेशासाठी किमान गुणांची अट असणार आहे. मात्र, सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेशासाठी आता प्राधान्य दिले जाणार नाही. कारण, युजीसी आता सर्व केंद्रीय विद्यापीठांसाठी एकच प्रवेश परीक्षा आयोजित करत आहे.

याबाबत युजीसीने स्पष्टीकरण दिलं असुन देशातील सर्व केंद्रीय विद्यापीठांसाठी सर्वांसाठी समान परीक्षा घेतली जाणार आहे. कारण याआधी बारावीत मिळालेल्या गुणांच्या आधारे प्रवेश दिला जात होता. त्यामुळे राज्य मंडळे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देशातील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळणे कठीण होते, असं युजीसीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.यूजीसीने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, 2022-23 सत्रापासूनच सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांना केंद्रीय विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न महाविद्यालयांमध्ये पदवीसाठी प्रवेश मिळेल.

Related Stories

पृथ्वीच्या दिशेने येतोय स्टेडियमएवढया आकाराचा लघुग्रह

datta jadhav

“काम झालेले नसतानाही पंतप्रधानांकडून मेट्रोचे उद्घाटन”

Abhijeet Khandekar

10 रोजी ईव्हीएम बेवफा असल्याचे म्हणतील

Patil_p

गुजरातमधील ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करावी

Archana Banage

ब्राझीलचा इक्वेडोरवर एकतर्फी विजय

Patil_p

दहशतवाद जगासमोरील सर्वात मोठे आव्हान

Patil_p