ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली सरकारने आपल्या नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत ड्राय डे ची संख्या आता 21 दिवसांवरून आता 3 दिवसांवर आणली आहे.
दिल्ली सरकारच्या उत्पादन शुल्क विभागाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, परवानाधारक दारूची दुकाने आणि ‘अफू’ची दुकाने प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी), स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) आणि 2 ऑक्टोबर रोजी गांधी जयंती या दिवशी बंद राहतील. या दिवशी दारू विक्रीस परवानगी दिली जाणार नाही.


दिल्ली उत्पादन शुल्क नियम 2010 मधील नियम 52 मधील तरतुदीनुसार, राष्ट्रीय राजधानी प्रदेश दिल्ली येथे सन 2022 मध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या सर्व परवानाधारकांनी आणि अफूच्या दुकानांद्वारे सूचीबद्ध करण्यात आलेले ड्राय डे पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असे विभागाने म्हटले आहे. एल-15 परवानाधारक हॉटेलमध्ये ‘ड्राय डे’ला मद्यविक्रीवर बंदी लागू होणार नाही, असेही आदेशात म्हटले आहे.