Tarun Bharat

आत्मनिर्भरतेसाठी संरक्षण मंत्रालयाने उचलले पाऊल

107 उपकरणांची निश्चित कालावधीनंतर आयात होणार बंद

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

संरक्षण मंत्रालयाने स्वदेशीकरण आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी गुरुवारी 107 सामग्रींची यादी जाहीर केली असून एका निश्चित कालावधीनंतर त्यांची आयात बंद केली जाणार आहे. यात अनेक उपप्रणाली आणि सुटेभाग सामील आहेत. या सामग्रींची आयात बंद करण्यासाठी 6 वर्षांची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

या यादीत हेलिकॉप्टर, पाणबुडी, युद्धनौका, रणगाडे, क्षेपणास्त्र, रडार आणि संचार प्रणालीच्या निर्मितीत आवश्यक सुटे भाग सामील आहेत. यातील बहुतांश सामग्रीची खरेदी सध्या रशियाकडून केली जातेय. मागील वर्षी डिसेंबरमध्ये संरक्षण मंत्रालयाने अशाच 2,851 उपकरणांची यादी जारी केली होती. या उपकरणांची आयात देखील काही काळानंतर बंद करण्यात येणार आहे.

नव्या बंदी यादीत सामील काही उपप्रणाली आणि सुटय़ाभागांचा वापर स्वदेशात विकसित केले जाणारे ऍडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर (एएलएच), लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (एलसीएच), लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (एलयुएच), इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सिस्टीम, अस्त्र क्षेपणास्त्र, टी-90 रणगाडा आणि इन्प्रंट्री कॉम्बॅट व्हेईकलच्या निर्मिती केला जाणार आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या या यादीत सामील 22 उपकरणांच्या स्वदेशीकरणाचे काम हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड करणार आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड 21 उपप्रणालींचे स्वदेशीकरण करणार आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स युद्धनौका आणि पाणबुडी निर्मितीसाठी वापरले जाणारे 6 सुटेभाग आणि उपप्रणालींचे स्वदेशीकरण करणार आहे.

याचबरोबर भारत डायनॅमिक्स लिमिटेडला अस्त्र क्षेपणास्त्रासाठी चार उपकरणांच्या स्वदेशीकरणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडला 12 उपकरणांच्या निर्मितीचे काम देण्यात आले आहे. या उपकरणांचे स्वदेशीकरण सार्वजनिक क्षेत्रातील संरक्षण उद्योगांकडून केले जाणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

Related Stories

लक्षावधी दिव्यांनी उजळून निघाली रामनगरी

Patil_p

31 जुलैपर्यंत सर्व बोर्डानी निकाल जाहीर करा : सर्वोच्च न्यायालय

Tousif Mujawar

ओमर अब्दुल्लांना भाजपाने पाठविले रेजर

prashant_c

प्रत्येक व्यवसायाचे देशविकासात योगदान

Patil_p

शेतकरी, लघुउद्योजकांना आणखी दिलासा

Patil_p

‘काँग्रेसमुक्त भारत’ हे ममता-भाजपचे स्वप्न

datta jadhav