Tarun Bharat

‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’च्या अंतर्गत सर्वांगीण विकास साधणार

प्रतिनिधी/ मडगाव

सरकारने यंदा जिल्हा पंचायतींना अधिकार देणार असल्याचे आश्वासन दिले आहे व यंदा ते आम्हाला मिळतील याची खात्री आहे. तरी असता ‘आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा’ अंतर्गतच्या योजना मार्गी लावून सर्वांगीण विकास साधण्याचे आपले प्रयत्न राहतील, अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा सुवर्णा प्रभू तेंडुलकर यांनी शुक्रवारी पदभार हाती घेतल्यानंतर व्यक्त केली.

सत्ताधारी भाजपकडून महिलांसाठी यंदा राखीव असलेल्या दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी प्रभू तेंडुलकर, तर उपाध्यक्षपदासाठी खुशाली वेळीप यांची निवड करून त्यांचे तेवढे अर्ज आल्याने गुरुवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशीच उभयतांची वरील पदांवर बिनविरोध निवड पक्की झाली होती. शुक्रवारी जिल्हा पंचायतीच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी त्रिवेणी वेळीप यांनी त्याची अधिकृत घोषणा केली. त्यांनंतर दोघांनी आपापल्या पदाचा ताबा घेतला.

आपणास जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी पात्र समजून पक्षाने उमेदवारी दिल्याने तसेच सर्व सदस्यांनी बिनविरोध निवडून दिल्याबद्दल प्रभू तेंडुलकर यांनी पक्षाचे तसेच जिल्हा पंचायत सदस्यांचे आभार मानले व सर्वांना एकत्र घेऊन विकासकामे राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

दरवेळी सरकार अधिकार देण्याचे आश्वासन देत असले, तरी नंतर काही प्रमाणात निधी उपलब्ध करण्याच्या व्यतिरिक्त काही देत नाही याकडे अध्यक्षांचे लक्ष वेधले असता, सरकारने मागील वषी चांगल्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने जिल्हा पंचायत सदस्य आपापल्या मतदारसंघात विकासकामे राबवू शकले आणि त्याचीच परिणती म्हणून जनतेने आम्हाला बहुमताने विजयी केले, असे त्या म्हणाल्या. मात्र निधीच्या जोडीला काही अधिकार मिळतील याची आम्हाला खात्री आहे, असे त्यांनी सांगितले.

Related Stories

फोंडय़ाचे पितापुत्र ‘रवी-रितेश’ कोरोनाबाधित

Patil_p

युवकावरील खुनी हल्ल्याचे उमटले तीव्र पडसाद

Amit Kulkarni

पाच बांगलादेशींना अटक, पाच स्थानबद्ध

Amit Kulkarni

मडगाव पालिकेने 30 कोटींहून जास्त थकबाकीच्या वसुलीवर भर द्यावा

Omkar B

किरण ठाकुर यांच्याकडून दिगंबर कामत यांचे अभिनंदन

Amit Kulkarni

मतदारसंघाचा विकास ही सतत चालू राहणारी प्रक्रिया : तवडकर

Omkar B