Tarun Bharat

आत्मसंरक्षणासाठी कराटेचे महत्त्व अधोरेखित करणारा धाडस

कराटे प्रशिक्षक विनायक दंडकर यांच्या लेखनीतून 20 मिनिटांचा चित्रपट साकार

प्रतिनिधी/ बेळगाव

ऊठ आणि दाखव तुझ्यातील धाडस! तुला लढायचं आहे, असा संदेश देत आत्मसंरक्षणासाठी कराटेचे महत्त्व अधोरेखित करणारा लघुचित्रपट बेळगावच्या तरुणाईने साकारला आहे. स्वतःचे संरक्षण स्वतःच करायचे, हे धाडस प्रत्येक मुलीने दाखविले पाहिजे, या विचारांना समोर ठेवत कराटे प्रशिक्षक विनायक दंडकर यांच्या लेखनीतून ‘धाडस’ हा 20 मिनिटांचा चित्रपट साकारण्यात आला आहे. दि. 19 ऑगस्ट रोजी यु-टय़ुबवर सदर चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे.

कराटेचे प्रशिक्षण देत असताना कराटे शिकणाऱयांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे. मात्र मुली क्लासला येताना कराटे शिकतेस? असा प्रश्न विचारणाऱयांची संख्याही तितकीच आहे. यामुळे आत्मसंरक्षणासाठी कराटेची भूमिका स्पष्ट करण्याच्या विचारातून प्रशिक्षक ते कलाकारपर्यंतचा प्रवास पूर्ण करत साधारण 1 वर्षाच्या कालावधीनंतर धाडस हा लघुचित्रपट साकारण्यात आला आहे. विविध आत्मसंरक्षणाचे प्रसंग सादर करत तुला पुढे यावे लागेल आणि स्वबळावर आत्मसंरक्षण करत जग जिंकावे लागेल, असा संदेश देण्यात आला असल्याचे विनायक दंडकर यांनी सांगितले.

साधारण 12 ते 15 कलाकारांच्या भूमिकेतून चित्रपट साकारण्यात आला असून  येळ्ळूर, राजहंसगड, तुडये, मुचंडी, चन्नम्मा सर्कल तसेच बेळगावातील विविध रस्त्यांवर चित्रपटाचे शुटींग झाले आहे. विनायक दंडकर व श्रेया यळ्ळूरकर यांच्या मुख्य भूमिकांबरोबरच शिवानी बस्तवाडकर, अनुजा बर्डे, निकिता अगसीमनी तसेच इतर कलाकार आहेत. सदर चित्रपटाचे दिग्दर्शन पंकज घाटगे यांनी केले असून साहाय्यक दिग्दर्शन व व्हिडिओग्राफी रितेश पाटील यांची आहे. प्रोडय़ुसर म्हणून अजित नारळकर, रोहित कुंडेकर, लक्ष्मीकांत आनंदाचे, संस्कृती विशाल दड्डीकर, यांचे आहे.

Related Stories

ऐश्वर्या हिट्टणगी यांना पीएचडी प्रदान

Amit Kulkarni

रविवारी 75 जण कोरोना पॉझिटिव्ह

Amit Kulkarni

दहावी पुरवणी परीक्षेचे मूल्यमापन 7 ऑक्टोबरपासून

Patil_p

सरस्वती वाचनालयातर्फे सोमवारी महेश काळे यांच्या गायनाची मैफल

Amit Kulkarni

संजीव किशोर नैर्त्रुत्य रेल्वेचे नवे महाव्यवस्थापक

Patil_p

एसएसएलसी परीक्षेबाबतचे चित्र अजूनही अस्पष्टच

Omkar B