Tarun Bharat

आत्महत्या करणाऱ्या कंत्राटदाराला कधीच भेटलो नाही-मंत्री ईश्वरप्पा

भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून राजकिय वातावरण तापले

Advertisements

बेंगळूर प्रतिनिधी

कर्नाटकचे मंत्री ईश्वरप्पा यांनी बुधवारी, १३ एप्रिल रोजी सांगितले की, माझ्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून आत्महत्या करणाऱ्या संतोष पाटील या कंत्राटदाराला आपण कधीही पाहिले नाही किंवा भेटलो नाही.

“मी या व्यक्तीला कधीही पाहिले किंवा भेटलो नाही. केंद्राला लिहिलेले पत्र आमच्या विभागाकडे पाठवण्यात आले होते. त्यावर माझे सचिव अतिक अहमद यांनी त्याला उत्तर दिले होते. त्यांना नागरी कामांच्या कत्राटांचे वाटप करण्यात आल्याचे रेकॉर्डवर काहीही दिसत नाही. त्यामुळे पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही. आमच्या विभागाने केंद्रालाही याबाबत कळवले आहे,”असे ते म्हणाले. “मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना यापूर्वीच भ्रष्टाचाराच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत,” असेही ईश्वरप्पा म्हणाले.

संतोष पाटील हा ठेकेदार लॉजमध्ये मृतावस्थेत आढळल्यानंतर ईश्वरप्पा यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे कर्नाटकातील राजकारण चांगलेच तापले आहे. पाटील यांनी आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मित्रांना व्हॉट्सअप मेसेज पाठवून आत्महत्या करण्याचा निर्णय सांगितला होता तसेच यासाठी कर्नाटकचे मंत्री ईश्वरप्पा यांना जबाबदार धरले होते.

Related Stories

शुक्रवारी अधूनमधून पावसाच्या सरी

Amit Kulkarni

‘मेहरूनिसा’ भारतीय चित्रपटसृष्टीत परिवर्तन घडवून आणेल

Archana Banage

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या दोन लाखांवर

datta jadhav

खानापुरात सुहास शिंदेंची सत्ता कायम

Archana Banage

संजय राऊतांच्या भेटीबद्दल फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

datta jadhav

कारवारमधील लंडन ब्रिज आता इतिहासजमा होणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!