Tarun Bharat

आत्महत्या प्रकरणी सासू सासरा व अन्य एकावर गुन्हा दाखल

प्रतिनिधी / शिरोळ

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी महादेव रामू जाधव, विद्या जाधव (दोघे रा. मायाक्का चिंचली, ता. रायबाग, जि. बेळगांव) व डॉ. किरण बबन शिंदे (रा. गणेशवाडी)  ता शिरोळ यांच्याविरुध्द शिरोळ पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.  

याबाबत  पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की ३० जून २०२१ रोजी प्रगती गरडे हिने औषध प्राशन करुन आत्महत्या केली होती. याप्रकरणी प्रगती गरडे हिचा नवरा गजानन आप्पासो गरडे (वय ३१) याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर संशयीताकडून गजानन याला पैशासाठी धमकी दिली जात होती. संशयितांच्या त्रासाला कंटाळून त्याने आगर ता. शिरोळ येथील फायनान्स कार्यालयात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. याबाबतची फिर्याद संजय आप्पासो गरडे (रा. माळेवाडी नरवाड, ता. मिरज, जि.सांगली) यांनी दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास पीएसआय कोरवी ताहीर मुल्ला पोहे का सानप हो का पोलीस कॉन्स्टेबल गजानन कोष्टी करीत आहेत. 

Related Stories

रत्नागिरी : मुन्नाभाई ‘आयएएस’अधिकाऱ्याला अटक

Archana Banage

कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा आकडा वाढला; आज 2119 पॉझिटिव्ह, 32 मृत्यू

Archana Banage

कोल्हापूर येथील बाल कल्याण संकुलमध्ये 14 मुली पॉझिटिव्ह

Archana Banage

किरकोळ कारणातून मित्राचा खून, तरुण दोषी

Archana Banage

कोल्हापूर : रिव्हॉल्वर विक्रीसाठी आलेल्या एकास अटक

Archana Banage

विद्यार्थी-पालकांचे लक्ष मराठा आरक्षणाच्या निर्णयाकडे

Archana Banage