Tarun Bharat

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हळदी येथील दोघांवर गुन्हा दाखल

वार्ताहर / पुलाची शिरोली

आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल हळदी ता. करवीर येथील दोघा जणांवर शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .युवराज बाजीराव पाटील व सुधीर शिंदे अशी गुन्हा दाखल झालेल्या दोन संशयित आरोपींची नावे आहेत. स्वरूपा भगवान इंदुलकर वय वर्ष १९. मुळगाव वारणा कोडोली तालुका पन्हाळा, सध्या रा. मालेवाडी ता. वाळवा, जि. सांगली यांनी फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की , मालेवाडी येथील ओंकार इंदुलकर या तरुणाने सहा डिसेंबर रोजी देसाई पेट्रोल पंपाच्या शेजारी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ओंकार इंदुलकर याने संशयित आरोपी पाटील व शिंदे यांच्याकडून १६ लाख ५० हजार रुपये किंमतीला ट्रक खरेदी केला होता. त्यासाठी त्यांनी साडेतीन लाख रुपये रोख दिले होते. उर्वरित त्या ट्रकवर एचडीबी फायनान्स कंपनीचे कर्ज होते. त्याचा दरमहा ४४४९४ इतका हप्ता ठरलेला होता. पण लॉकडाऊनच्या काळात हप्ते भरण्यासाठी सवलत दिली होती.

तरीदेखील युवराज पाटील व शिंदे यांनी इंदुलकर यांच्या ताब्यात असलेला ट्रक ओढून आणला होता. पाटील आणि शिंदे यांनी इंदुलकर यांच्याकडून घेतलेली रक्कम परत देण्यास वारंवार टाळाटाळ केली होती. त्यामुळे इंदुलकर मानसिक तणावामध्ये गेला होता. याच कारणामुळे आपल्या भावाने आत्महत्या केली आहे . त्यास युवराज पाटील व सुधीर शिंदे हे दोघे जबाबदार आहेत . म्हणून इंदुलकर यांची बहीण स्वरुपा हिने शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. स.पो.नि. किरण भोसले हे पुढील तपास करीत आहेत.

Related Stories

संभाजीराजेंची राजकीय ‘वाट’‘चाल’ 12 तारखेला ठरणार!

Abhijeet Khandekar

तामगावात एकाची गळफास घेऊन आत्महत्या

Archana Banage

कोल्हापूर : ‘दक्षिण’ मध्ये रविवारी ५ हजार झाडे लावणार

Archana Banage

माजी आमदार चंद्रदीप नरके शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात!

Archana Banage

राज्य मागासवर्ग आयोगाच झालं काय ?

Abhijeet Khandekar

कोल्हापूरसह करवीर, इचलकरंजीत होणार उद्यापासून सेरॉलॉजीकल सर्व्हे

Archana Banage