Tarun Bharat

आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा : सौरभ राव

  • पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणूक


ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सोमवारी (दि. 2) जाहीर झाली आहे. त्याची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलात आणण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे  काटेकोर पालन करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सौरभ यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात निवडणूक विभागाच्या सर्व अधिका-यांची बैठक विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपायुक्त प्रताप जाधव आणि निवडणूक यंत्रणेशी सबंधित  अधिकारी उपस्थित होते.


आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या सर्व सूचना, कोविड 19 च्या अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी  आदींबाबत आयुक्त राव यांनी सूचना केल्या. प्रत्येक मतदान केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवण्याबाबत दक्षता घेण्यात यावी तसेच अचूक, शास्त्रोक्त व समन्वयाने वेळेत कामे पूर्ण करण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त राव यांनी दिल्या. बैठकीत जाधव यांनी निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली.

Related Stories

बंडखोर आमदारांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; सुनावणी लांबली

Abhijeet Khandekar

‘रमजान ईद’ निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून शुभेच्छा!

Tousif Mujawar

उध्दव ठाकरेंची मुलाखत ही फिक्स मॅच ; देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र

Abhijeet Khandekar

अस्लम शेख यांना पर्यावरण मंत्रालयाची नोटीस

Archana Banage

राजकीय हालचालींना वेग! देवेंद्र फडणवीस तात्काळ दिल्लीकडे रवाना

Archana Banage

मुंबई-गोवा महामार्गाचं काम २०२३ पर्यंत पूर्ण करणार – मंत्री रवींद्र चव्हाण

Archana Banage