Tarun Bharat

आदर्श युवा संघाच्या 21 व्या लोकोत्सवाचे उद्घाटन

25 सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव, विविध राज्यांतील पथकांच्या लोकनृत्यांनी मने जिंकली

प्रतिनिधी /काणकोण

आमोणे, पैंगीण येथील आदर्श ग्रामात भरलेल्या 21 व्या लोकोत्सवाचे गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पारंपरिक समई प्रज्वलित करून शुक्रवारी उद्घाटन केले. आदर्श युवा संघ मागच्या 21 वर्षांपासून लोकोत्सवाचे आयोजन करतआहे. या उद्घाटन सोहळय़ाला बलराम शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष असलेले माजी मंत्री रमेश तवडकर, भाजपाच्या महिला मोर्चाच्या काणकोण अध्यक्षा विंदा सतरकर, आदर्श युवा संघाचे सचिव जानू तवडकर, श्रीकांत तवडकर, काणकोण भाजप मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

तीन दिवस चालणाऱया या लोकोत्सवात कंदमुळे, औषधी वनस्पती, तयार कपडे,  फळभाज्यांचे स्टॉल्स भरविण्यात आले आहेत. यंदा 100 पेक्षा अधिक स्टॉल्स या ठिकाणी असून पारंपरिक लोकनृत्ये, फुगडी, क्रीडास्पर्धा, विज्ञान प्रदर्शनाबरोबरच प्रथमच राजस्थान, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा, कर्नाटक राज्यांतून आलेल्या लोककला पथकांनी बहारदार अशी लोकनृत्ये सादर करून  प्रेक्षकांची मने जिंकली.

25 जणांचा गौरव लोकोत्सवाचे औचित्य साधून काणकोण तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये योगदान दिलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांचा यंदा गौरव करण्यात येणार असून पहिल्या दिवशी भिवा जानू वेळीप, तोळू गावकर, गोपालकृष्ण दैकर, विशाल दत्ताराम नाईक, चंदा चंद्रकांत गावकर, दीक्षा दया पागी, अमिता उल्हास पैंगीणकर, रामा विष्णू सतरकर, विठे लक्ष्मण देसाई, वैशाली नाईक, भारती आनंद नाईक, नयनी गावकर, भव्या भिकाजी कोमरपंत, आबोले म्हाळगो गावकर, दीपिका दया सुदिर, प्रेमानंद रघुनाथ  च्यारी, रमाकांत चिंतामणी टेंगसे, संतोष पागी, यशवंत जानू गावकर, भानू बोनो वेळीप, विठोबा लिंगू वेळीप, झिलू गोविंद वेळीप, प्रदीप बंदे नाईक, शाणू बोमो वेळीप आणि गोपाळ नाईक या 25 जणांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. आज 11 रोजी दुपारी 12 वा. छत्तीसगडच्या राज्यपाल अनसुया उकेयी या प्रमुख पाहुण्या, तर गोव्याचे वीजमंत्री नीलेश काब्ा्राल सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

गोविंद गावडे यांनी भरला उमेदवारी अर्ज

Abhijeet Khandekar

पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे या

Amit Kulkarni

दिल्ली सीबीआय पथकाने नोंदविले बीडीओंचे जबाब

Amit Kulkarni

पालये भूमिका टेक्निकल इन्स्टिटय़ूटमध्ये नाताळ

Patil_p

प्रबोधन प्राथमिक विभागाच्या इमारतीची 28 रोजी पायाभरणी

Amit Kulkarni

सांखळी बाजारात विद्यार्थ्यांना लागणारे साहित्य उपलब्ध

Amit Kulkarni