Tarun Bharat

आदर्श हायस्कूल भामटेच्या मच्छिंद्र कुंभार यांना २०२० चा ग्लोबल टिचर पुरस्कार

सांगरुळ / प्रतिनिधी

आदर्श हायस्कूल भामटे (ता. करवीर ) या शाळेतील सहाय्यक शिक्षक मच्छिंद्र रघुनाथ कुंभार यांना नुकताच मानाचा ११० देशांचा सहभाग असलेला ग्लोबल टीचर पुरस्कार २०२० ने सन्मानित करण्यात आले.

एम आर कुंभार हे गणित विषयाचे अध्यापक आहेत. त्यांनी गणित विषयांमध्ये तयार केलेली १०५ ॲप्स, अनेक व्हिडिओ ई- कन्टेन्ट, गणित विषयासाठी बनविलेल्या ५००० हून अधिक कृतीपत्रिका, वर्गामध्ये राबविलेले विविध नवोपक्रम त्याचबरोबर भूमितीसारखा काठिण्य पातळीचा विषय सुलभ व्हावा यासाठी त्यांनी राबवलेल्या कृतीतून शिक्षण या नवोपक्रमांची दखल विद्या प्राधिकरण पुणे (एससीआरटी) यांनी घेतली आहे.

त्याचबरोबर नवोपक्रमाविषयीचे त्यांचे पाच लेख आंतराष्ट्रीय जर्नलमध्ये झळकले आहेत. इयत्ता नववी व दहावीच्या गणित विषयासाठी इंटरॅक्टिव्ह ॲनिमेटेड फ्लिपबुक ही संकल्पना राबवून एका क्यूआर कोडमध्ये संपूर्ण पाठ्यपुस्तक तयार करून शिक्षकांचे अध्यापन व विद्यार्थ्यांचे अध्ययन त्यांनी सुलभ केले आहे. गणित भाग १ व गणित भाग २ या दोन्ही पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकाला एक स्वतंत्र क्यूआर कोड तयार करून त्याचे पाठ्यपुस्तक तयार केले आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः क्युआर कोड तयार करून आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये ते चिकटवलेले आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्ययन व अध्यापन या दोन्ही प्रक्रिया अत्यंत सुलभ होण्यास मदत झाली आहे. नियमित उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहेच शिवाय जर एखादा विद्यार्थी गैरहजर राहिल्यास त्याचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी क्युआर कोडयुक्त पाठ्यपुस्तक एक वरदान ठरले आहे.

विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांनी केलेल्या या व अशा विविध शैक्षणिक कार्याची दखल घेऊन एकेएस फाउंडेशन, दिल्ली यांनी त्यांना मानाचा ग्लोबल टीचर २०२० हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

एम आर कुंभार यांना प्राचार्य मा. डॉ. आय. सी. शेख , माध्यमिकचे शिक्षणाधिकारी किरण लोहार , उपशिक्षणाधिकारी डी. एस. पोवार , करवीरचे गटशिक्षणाधिकारी एस. के. यादव , विस्तार अधिकारी श्री ओतारी , डी. सी. कुंभार विश्वास सुतार , कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील व संघाचे सर्व पदाधिकारी व संचालक, आदर्श हायस्कूल भामटेचा सर्व शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ कोल्हापूर जिल्हा तंत्रस्नेही टिम (TSTS) चे सर्व तंत्रस्नेही शिक्षक व मुख्याध्यापक संघातील गणित-विज्ञान विषय समितीतील सर्व सदस्य या सर्वांचे सहकार्य मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले आहे.

Related Stories

संगरूर पोटनिवडणुकीसाठी केवल सिंह ढिल्लोंना उमेदवारी

Patil_p

राष्ट्रवादी महिला आघाडीने पंतप्रधानाना पाठवले पत्र

Patil_p

जुहीला 5G नेटवर्क विरोधात याचिका करणे पडले महागात ; दिल्ली उच्च न्यायालयाकडून २० लाखांचा दंड

Archana Banage

वाराणसीतून निवडणूक लढविणार ओमप्रकाश

Patil_p

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांना फक्त गदाच

Patil_p

जम्मूमधील किश्तवाडमध्ये ३०० फूट खोल दरीत कोसळली कार, ८ जण ठार

Archana Banage