Tarun Bharat

आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक

मुंबई / प्रतिनिधी

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअॅपवरून मेसेज जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. जयसिंह राजपूत असे धमकी देणाऱ्याचे नाव असून त्याने दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा चाहता असल्याचा दावा केला आहे. जयसिंह राजपूत याला मुंबई क्राइम ब्रांचच्या सायबर सेलने अटक केली आहे.

या आरोपीस बंगळूरहून अटक करण्यात आली असून आरोपी जयसिंग राजपूत याने 8 डिसेंबरच्या मध्यरात्री 12 च्या सुमारास मंत्री आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज पाठवला. त्या मेसेजमध्ये त्याने सुशांत सिंहच्या मृत्यूला आदित्य ठाकरेंना जबाबदार ठरवले आहे.
या मॅसेजनंतर त्याने तीन कॉलही केले असून. आदित्य ठाकरेंनी ते फोन उचललेही होते. त्यानंतर आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याचा मेसेज त्याने आदित्य ठाकरेंना पाठवला होता. याप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

सहय़ाद्रि कारखान्याकडून 150 बेडच्या कोविड सेंटरची उभारणी

Patil_p

कोल्हापूर : रुईत पूरग्रस्त चिमणी-पाखरांना मिळालं जीवदान

Archana Banage

साकत ग्रामस्थांचा नीलकंठा नदीतून जीवघेणा प्रवास !

Archana Banage

दुसरया दिवशीही लॉकडाऊनला प्रतिसाद

Patil_p

महाराष्ट्रात पुन्हा विक्रमी वाढ! बुधवारी 67,468 नवे कोरोना रुग्ण; 568 मृत्यू

Tousif Mujawar

मी तुम्हाला महाराष्ट्रात नकोय का?, लोकसभा लढविण्याच्या मुद्यावर फडणवीसांचा सवाल

datta jadhav