Tarun Bharat

आदित्य बिर्ला-सन लाईफ आयपीओ आणण्याच्या तयारीत

संचालक मंडळाकडून मिळाली मंजुरी

वृत्तसंस्था / मुंबई

देशातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपनी आदित्य बिर्ला आणि सन लाईफ असेट या कंपन्या आयपीओ आणण्याच्या तयारीत आहेत. यासाठीची योजना तयार करण्यात आली आहे. याकरीताच्या प्रस्तावाला कंपनीच्या संचालक मंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. साधारणपणे म्युच्युअल फंडच्या तीन कंपन्या शेअर बाजारामध्ये लिस्ट झाल्या आहेत. यामध्ये एचडीएफसी, निप्पॉन आणि युटीआय म्युच्युअल फंड यांचा समावेश आहे.  आदित्य बिर्ला कॅपिटलने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये संचालक मंडळाने मंजुरी दिल्याचे सांगितले आहे. कंपनीमध्ये आदित्य बिर्लाचा 51 टक्क्यांचा हिस्सा आहे. ज्यामध्ये कॅनडाची फायनान्शिअल सर्व्हिसेस सन लाईफचा 49 टक्क्यांचा वाटा आहे. या अगोदर देशातील सर्वात मोठी म्युच्युअल फंड कंपनी स्टेट बँक म्युच्युअल फंडही आयपीओ आणण्याची तयारी करत आहे. आयपीओच्या माध्यमातून बाजारातून 7,500 कोटी रुपये उभारण्याचे संकेत आहेत. डिसेंबर तिमाहीत आदित्य बिर्ला म्युच्युअल फंडला 147 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. कंपनी आयपीओच्या आधारे जवळपास 2,500 कोटी रुपये उभारण्याची योजना आखत आहे. यासोबतच सदरचा आयपीओ हा म्युच्युअल फंड कंपनीमधील चौथा असल्याची माहिती आहे.

Related Stories

टाटा कॅपिटलची बायोकॉनमध्ये गुंतवणूक

Patil_p

मैदा वर्षभरात 40 टक्क्यांनी वधारला

Patil_p

पेटीएमचे समभाग नुकसानीतच

Patil_p

भारतीय कंपन्यांमध्ये ‘रिलायन्स’ अव्वल

Patil_p

भारतीय कंपन्यांसाठी आगामी वर्ष फायदेशीर

Omkar B

आयुर्विमा कंपन्यांच्या नवीन प्रीमियम उत्पन्नात वाढ

Patil_p