Tarun Bharat

आदिनाथ बचावासाठी साडेतीन कोटी रुपयांच्या ठेवी देण्याचे सभासदांचे आश्वासन

Advertisements

आदिनाथ सुरू करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, हरिदास डांगे

प्रतिनिधी / करमाळा

आदिनाथ सहकारी साखर कारखाना करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा कारखाना असून तो सहकारी तत्त्वावर चालला पाहिजे ही काळाची गरज आहे त्यासाठी आता सभासदांनी रक्कम उभा करून कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्यासाठी मी माझे एक कोटी रुपयाचे योगदान कारखान्यासाठी देण्यास तयार असल्याचे साखर कारखान्यातील तज्ञ आदिनाथ कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांनी जाहीर केले .उपस्थित असलेले डॉ. वसंतराव पुंडे 50 लाख, प्रा. रामदास जवळे 50 लाख, धुळा भाऊ कोकरे 50 लाख, महेश चिवटे 25 लाख, प्रा जयप्रकाश बिले 10 लाख, रवींद्र गोडगे 10 लाख, महेंद्र पाटील दहा लाख प्रा शहाजीराव देशमुख, 10 लाख डॉ. अमोल घाडगे दहा लाख ,अविनाश सरडे 10 लाख प्रा. शिवाजीराव बंडगर पाच लाख जवळपास मिळून साडेतीन कोटी रुपयांची निधी उपलब्ध करण्याचे जाहीर केले.

आदिनाथ सहकारी साखर कारखाना बचाव समितीच्या बैठकीत

यावेळी बोलताना हरिदास डांगे म्हणाले की या रकमेची ठेव पावती कोणत्याही बँकेत करून ही पावती तारण ठेवण्यासाठी ना हरकत घेऊन यावरून यावर कर्ज उचलून कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल, जवळपास तीस कोटी रुपये उपलब्ध झाले तर कारखान्याचे चाक फिरून कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने चालून तालुक्यातील ऊस उत्पादकांच्या भावी पिढीचे आयुष्य सुखकर होईल राजकारणी विहिरीत सर्वांनी एकत्रित यावे, या कामासाठी तालुक्यातील सर्व नेते मंडळींनी ही मदत करावी कर्मचाऱ्यांनीही परिस्थिती समजून दोन पाऊले मागे पुढे घेऊन हा प्रश्न पुढे सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत असे आव्हान केले.

मंगळवारी महाशिवरात्रि दिवशी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर सकाळी 11 वाजता र्व कर्मचार्‍यांच्या भावना जाणून घेऊन पुढील रूपरेषा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जमा होणाऱ्या रकमेचा वापर करण्यासाठी सह्यांचा अधिकार हरिदास डांगे यांना देण्याची एकमताने ठरले. ही रक्कम पूर्तता झाल्यानंतर देशाचे नेते शरदचंद्रजी पवार, अजित दादा पवार यांना भेटण्यासाठी आदिनाथ पदाधिकारी जाणार असल्याची माहिती डॉ. वसंत पुंडे यांनी दिली.

हरिदास डांगे यांनी अनेक कारखाने उभा करून सक्षम पणे चालवले आहेत. हरिदास डांगे यांचा आमचा कामगार कोणताही शब्द मोडणार नाही. महाशिवरात्रि दिवशी सर्व कामगारांना विश्वासात घेऊन आदिनाथ सहकार तत्त्वावर चालविण्यासाठी सर्व कामगार कामाला लागतील असा विश्वास व्यक्त केला. या बैठकीसाठी आदिनाथ चे व्हाईस चेअरमन रमेश कांबळे, संतोष पाटील, पोपटराव सरडे, सुदर्शन शेळके, रेवनसिद्ध झिंजाडे, पप्पू वाडेकर, भीमराव येडे, अण्णासाहेब सुपनर, राजेंद्र बेरे, नासीर कबीर, अमोल नरोटे, धनंजय शिंदे, श्रीराज घाडगे, मारुती रोंगे, अविनाश सरडे, अमरजीत साळुंके, संजय शिंदे, अनिल तेली आधी जण उपस्थित होते.

आदिनाथ कारखाना सहकारी तत्त्वावर चालला पाहिजे तरच ऊस उत्पादक शेतकऱ्याला भावी काळात न्याय मिळणार आहे हा कारखाना सुरू करण्यासाठी पश्चिम भागातून ऊस उत्पादक शेतकरी कोट्यवधी रुपये देण्यासाठी तयार आहेत पण विश्वास देणारा चेहरा पाहिजे होता आज हरिदास डांगे चे रूपाने आदिनाथ आता चालू शकतो व प्रगती करू शकतो याचा विश्वास निर्माण झाला आहे. यामुळे 25 ते 30 कोटी रुपये ठेवी गोळा करण्यात कोणतीही अडचण येणार नाही,

हरिदास डांगे यांच्या अटी

जो दोन कोटी रुपयांच्या ठेवी देईल त्याने संचालक पदाचा अर्ज भरावा,
कारखान्याच्या कारभारात राजकीय हस्तक्षेप करू नये .
जो कर्मचारी काम करेल त्याचाच पगार भावी काळात मिळेल.

Related Stories

भारतीय विद्या भवनमध्ये ५ जानेवारी रोजी ‘अभिनयमाला’

prashant_c

भारतीय मेकअप आर्टिस्ट जगात भारी : विक्रम गायकवाड

prashant_c

महात्मा गांधींवरील कार्यक्रम दबावातून रद्द

prashant_c

बार्शी – सोलापूर दरम्यान विचित्र अपघात

Abhijeet Shinde

दहावी-बारावी प्रवेशपत्रावर आता परीक्षेचे वेळापत्रकही

prashant_c

पंढरपूर जवळील अपघातात चंदगड येथील पाच ठार तर 11 जण जखमी

Abhijeet Shinde
error: Content is protected !!