Tarun Bharat

‘आदिपुरुष’च्या चित्रिकरणास मुंबईत प्रारंभ

प्रभास अन् सैफ अली खान मुख्य भूमिकेत, मेगा बजेट अन् त्रिमितीय चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि सैफ अली खान यांच्या ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे चित्रिकरण मंगळवारपासून मुंबईत सुरू झाले आहे. यासंबंधीची घोषणा स्वतः प्रभासनेच समाजमाध्यमांवरून केली आहे. प्रभासने या पोस्टसह एक पोस्टरही प्रसारित केली असून त्यावर ‘आदिपुरुष’ बुराईपर अच्छाई की जीत का जश्न ‘आरंभ’ असा उल्लेख आहे. हा मेगाबजेट असलेला त्रिमितीय चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

दीर्घकाळापासून चर्चेत राहिलेल्या या चित्रपटासाठी मागील काही दिवसांपासून तयारी सुरू होती. ओम राऊत याच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा ‘आदिपुरुष’ हा रामायणावर आधारित आहे. या चित्रपटात प्रभास भगवान राम तर सैफ अली खान हा रावणाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.

व्हीएफएक्सचा होणार वापर

चित्रपटात व्हीएफएक्सचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जाणर आहे. कुठल्याच भारतीय चित्रपटात व्हीएफएक्स अनुभवले नसेल अशाप्रकारची दृश्ये या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. निर्मात्यांनी 19 जानेवारीपासूनच चित्रपटाचे टेस्ट शूटिंग बंद स्टुडिओत सुरू केले होते.

350 ते 400 कोटींचे बजेट

त्रिमितीय स्वरुपात तयार होणारा हा चित्रपट हिंदी, तेलगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपटाची निर्मिती ओम राऊत यांच्यासह भूषण कुमार, प्रसाद सुतार आणि राजेश नायर हे करत आहेत. हा चित्रपट 350 ते 400 कोटींच्या मेगाबजेटने तयार होणार असल्याचे समजते.

Related Stories

शेमारू मराठीबाणा वाहिनीची अनोखी भक्तीमय भेट

Patil_p

भरत जाधवचा असाही पुढाकार

Patil_p

‘मिनिमम’मध्ये सबा अन् नसीरुद्दीन शाह

Patil_p

योगी आदित्यनाथांच्या भेटीनंतर कंगना रनौत झाली उत्तर प्रदेशच्या ODOP मोहिमेची ब्रँड अँम्बेसेडर!

Archana Banage

शेलेब्जचे प्राणीही लय भारी…

tarunbharat

विकी कौशल माधुरीवर फिदा

Omkar B