Tarun Bharat

आदिमानव विलुप्त होण्याचे मिळाले कारण

Advertisements

वैज्ञानिकांच्या चिंतेत पडली भर, विध्वंसक इतिहासाच्या पुनरावृत्तीची भीती

आदिमानवाची प्रजाती नियंडरथल अखेर पृथ्वीवरून कशामुळे विलुप्त झाले होते या प्रश्नाचे उत्तर मिळताना दिसुन येत आहे. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र संपुष्टात येणे आणि ध्रूवांच्या पलटल्यामुळे असे घडले असावे असा दावा आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या एका पथकाने स्वतःच्या अध्ययनात केला आहे. ही घटना 42 हजार वर्षांपूर्वी घडली होती आणि सुमारे 1 हजार वर्षांपर्यंत अशीच स्थिती रहिली होती.

दर 2 ते 3 लाख वर्षांनी असा प्रकार होतो. पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कमजोर होत असल्याचे पाहता ध्रूवांच्या पलटण्याची वेळ नजीक येत असल्याचे वैज्ञानिकांचे आकलन आहे.

पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र

पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र मानव आणि अन्य प्राण्यांसाठी जीवसृष्टी शक्य करते. हे चुंबकीय क्षेत्र सूर्याकडून येणारे सौरवादळे आणि कॉस्मिक किरणे आणि हानिकारक किरणोत्सर्गापासून ओझोनच्या थराला वाचविते. हे क्षेत्र ध्रूवांवर सर्वाधिक असते पण कधीकधी ते पलटूनही जाते. एवढेच नाही तर समाप्त होण्यापूर्वी अत्यंत कमजोर होत चुंबकीय क्षेत्रामुळे मोठे नुकसान होऊ शकते.

नाटय़मय हवामान बदल

ध्रूवांमध्ये झालेल्या बदलाचे परिणाम नाटय़मय राहिले असतील आणि हवामानाची स्थिती भीषण झाली असावी. याचमुळे आदिमानव विलुप्त झाले असावेत असे अध्ययनात म्हटले गेले आहे.  या बदलातून निर्माण झालेल्या प्रतिकूल हवामानापासून वाचण्यासाठी निएंडरथल गुहांमध्ये लपू लागल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे.

विनाशाच्या दिशेने पृथ्वी?

पृथ्वीचे ध्रूव दर 2 ते 3 लाख वर्षांनी बदलतात, पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कमजोर होत आहे. ध्रूवांच्या पलटण्याची वेळ नजीक आल्याने हे घडले असू शकते असे काही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. ध्रूव पलटल्यास पृथ्वीवरील स्थिती विध्वंसक राहणार असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

Related Stories

किम जोंग उन कोमात, बहिणीकडे सत्तासूत्रे

Patil_p

अफगाणिस्तानात बॉम्बस्फोट, 7 ठार

Patil_p

स्पेसएक्सकडून विक्रमी 143 उपग्रह प्रक्षेपित

Patil_p

ऑक्टोबरमध्ये येणार लहान मुलांसाठी कोरोनावरील लस

Abhijeet Shinde

धक्कादायक! WHO च्या 21 कर्मचाऱ्यांकडून महिलांवर अत्याचार

datta jadhav

वुहानच्या प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा फैलाव, आमच्याकडे सबळ पुरावे

prashant_c
error: Content is protected !!