Tarun Bharat

‘आद्य क्रांतिकारकांना’ दीपोत्सवातून अनोखी मानवंदना

ऑनलाईन टीम / पुणे :

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या 175 व्या जयंतीनिमित्त तब्बल 500 दिव्यांनी साकारलेल्या दीपोत्सवातून त्यांना अनोखी मानवंदना देण्यात आली. संगम पूल आणि इंजिनिअरींग कॉलेजच्याजवळ सीआयडी ऑफिसच्या आवारात वासुदेव बळवंत फडके यांचे स्मारक आहे. तेथे ब्रिटीशकाळात न्यायालय होते, त्यावेळी त्यांच्यावर येथे खटला चालला होता आणि त्यांना जन्मठेपेची देखील शिक्षा सुनावण्यात आली. त्या जागेतील स्मारकात दीप प्रज्वलित करण्यात आले. 


इतिहास प्रेमी मंडळातर्फे इंजिनिअरींग कॉलेजच्याजवळ सीआयडी ऑफिसच्या आवारात त्यांच्या स्मारकासमोर ही मानवंदना देण्यात आली. यावेळी क्रांतिकारक चरित्रलेखक कृ.पं.देशपांडे, कॅटलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील माने, इतिहास प्रेमी मंडळाचे अध्यक्ष मोहन शेटे यांसह फडके स्नेहवर्धिनीचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यावेळी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. 


कृ.पं.देशपांडे म्हणाले, क्रांतिकारक फडके यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 रोजी पनवेल जवळील शिरढोण येथे झाला. पुण्यामध्ये नोकरीच्या निमित्ताने रहात असतानाच इंग्रजांच्या विरोधात त्यांच्या मनात क्रोध निर्माण झाला. स्वदेशी वस्तूंचा वापर, सार्वजनिक सभेचे कार्य, स्वदेशी उद्योगधंदे, राष्ट्रीय शिक्षण देणा-या शाळांची स्थापना अशा अनेक कार्यांत ते सहभागी होते.

Related Stories

खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांना ‘युवक क्रांतीवीर’ पुरस्कार जाहीर

prashant_c

सांगली : मिरजेत दोनशे वर्षांपूर्वी आला चहा; सन १७९९च्या पत्रात उल्लेख

Archana Banage

पुणे : मंडईच्या शारदा गजाननाचा गणेशोत्सव यंदा साधेपणाने

Tousif Mujawar

यंदाचा सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह ‘कोरोना योद्धयांना’ समर्पित

Tousif Mujawar

आंतरराज्यीय रक्तदान शिबीरात 800 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी केले रक्तदान

Tousif Mujawar

‘या’ देशात तयार होतोय तब्बल 11 कोटी 23 लाखांचा मास्क

datta jadhav