Tarun Bharat

आधारकार्ड मोबाईल लिंकसाठी सर्वसामान्यांची लूट

Advertisements

शुल्क केवळ 50 रुपये पण शंभर ते दीडशे रुपयासाठी तगादा : खानापूर पोस्ट खात्यातील कर्मचाऱयांचा कारभार

वार्ताहर /खानापूर

आधारकार्ड हे आता प्रत्येक कार्यालयीन कागदपत्रांसाठी सक्तीचे केल्याने आधारकार्डातील चूक दुरुस्ती तसेच मोबाईल लिंक करण्यासाठी अनेकांची धावपळ सुरू आहे. खानापूर तालुक्मयात पोस्ट खात्यालाही आता आधारकार्डवर मोबाईल नंबर लिंकसाठी जबाबदारी एनजीओमार्फत देण्यात आली आहे. परंतु आधारकार्डवर मोबाईल लिंकसाठी शुल्क आकारणीत सर्वसामान्यांची लूट होत आहे.

 खानापूर तालुक्मयात पोस्ट खाते अंतर्गत तालुक्मयातील 35 पोस्ट विभागात सदर आधारकार्डवर मोबाईल नंबर लिंकसाठी पोस्टमनना जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु अनेक पोस्टमन आधारकार्ड मोबाईल लिंकसाठी 100 ते 200 रुपये आकारत आहेत, अशा तक्रारी वाढल्या आहेत. वास्तविक एक आधारकार्ड लिंकसाठी केवळ 50 रुपये शुल्क आकारणीचा आदेश आहे. पण तालुक्मयातील काही पोस्टमन आपल्या कार्यक्षेत्राबाहेर जाऊन जनतेची दिशाभूल करत शंभर ते दोनशे रुपये शुल्क आकारत आहेत.

अनेक पोस्टमन आपल्या कार्यक्षेत्रात काम करण्याऐवजी डबल मोबदला कमावण्यासाठी तालुक्यातील पै-पाहुणे, नातेवाईक अथवा ओळखीच्या ठिकाणी जाऊन आधारकार्ड नंबर लिंक करून देण्याचे सांगून प्रत्येकी शंभर ते दोनशे रुपये कमावत आहेत. दुसऱया गावात जाऊन सायंकाळी पाचनंतर रात्री 12 वाजेपर्यंत हा व्यवसाय अनेकांनी सुरू ठेवला आहे. अधिक कमाईसाठी दुसऱया ठिकाणी जाऊन हा फायद्याचा व्यवसाय करत असल्याचे दिसून येत आहे. एका ठिकाणी किमान दररोज 100 हून अधिक जणांचे आधार लिंक केले जात आहे.

वरिष्ट अधिकाऱयांनी कारवाई करावी

  आधार लिंकसाठी केवळ 50 रुपये शुल्क आकारणी व आपल्याच कार्यक्षेत्रात काम करण्यासाठी पोस्ट खात्याने सूचना केली आहे. पण अनेक पोस्टमन आपल्या  कार्यक्षेत्राबाहेर जाऊन लाभ उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पोस्ट खात्याच्या वरि÷ अधिकाऱयांनी त्यांच्यावर कारवाई करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

यासंदर्भात खानापूर पोस्ट मास्तर बेंनचिनमर्डी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, बेळगावातील एक एनजीओमार्फत सर्वसामान्य जनतेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खानापूर तालुक्मयातील 35 पोस्टमनना जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत जवळपास 15 पोस्टमन याची अंमलबजावणी करत आहेत. उर्वरित पोस्टमनलाही लवकरात लवकर ही सुविधा देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

अधिक शुल्क आकारणी केल्यास कायदेशीर कारवाई

 प्रत्येक पोस्टमनने आपल्या पोस्ट कार्यक्षेत्रातील गावातील ग्राहकांची सोय करून देणे सक्तीचे आहे. तसेच एका आधारकार्डवर मोबाईल लिंकसाठी केवळ 50 रुपये शुल्क आकारणी करण्याची सूचना दिली आहे. त्यापेक्षा अधिक आकारणी केल्यास व तशी तक्रार आल्यास त्यांच्याकडून लिंकसाठी दिलेले अधिकार काढून घेण्यात येतील व कायदेशीर कारवाई केली जाईल.

-बेंनचिनमर्डी खानापूर, पोस्टमास्तर

Related Stories

चाकूहल्ल्यात मारुतीनगरचा तरुण जखमी

Patil_p

मरगाई यात्रा रद्द केल्याबद्दल देवस्थान कमिटीचे कौतुक

Patil_p

नाईट पार्किंगसाठी दुसरे विमान होणार दाखल

Patil_p

मंदिरे सर्वांना ऊर्जा देणारी शक्तीपीठे

Omkar B

शिवाजी कॉलनीत जाणाऱया रस्त्याची दुरवस्था

Amit Kulkarni

तांत्रिक बिघाडामुळे परीक्षार्थींना फटका

Patil_p
error: Content is protected !!