Tarun Bharat

आधार, शादी, डब्बा ऑक्सफर्ड डिक्शनरीत

दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन : 384 भारतीय शब्दांचा समावेश : नवीन एक हजार शब्दांनाही स्थान

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इंग्रजी भाषेच्या जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड डिक्शनरीच्या (शब्दकोश) दहाव्या आवृत्तीमध्ये  384 भारतीय शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये आधार, चॉल, हडताल, डब्बा, शादी आदी हिंदी बोलीभाषेतील शब्दांनाही स्थान देण्यात आले आहे.

काळानुसार भाषेमध्ये होणाऱया बदलांचा विचार करून ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये जगभरातील भाषांमधील शब्दांचा समावेश केला जातो. शुक्रवारी डिक्शनरीच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन झाले. यामध्ये 384 भारतीय भाषेतील शब्दांचा आणि जगभरातील भाषांमधील एक हजार नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. चॅटबॉट, फेकन्यूज, मायक्रोप्लास्टिक अशा शब्दांना स्थान देत काळानुसार इंग्रजी भाषेत  करण्यास ऑक्सफर्ड अग्रस्थानी असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.  ऑक्सफर्ड वेबसाईटमध्ये ऑडिओ-व्हिडिओ टय़ुटोरियल उपलब्ध आहेत. डिक्शनरीमध्ये 26 भारतीय इंग्रजीमध्ये वारण्यात येणाऱया शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. यातील 22 शब्द प्रिटेंड डिक्शनरीत (मुद्रित शब्दकोश) असेल. तर सर्व 26 शब्द डीजिटल आवृत्तीमध्ये असतील, अशी माहिती ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शिक्षण विभागाच्या व्यवस्थापकीय संचालक फातिमा दाद यांनी दिली.

Related Stories

गांधी कुटुंबासंबंधी ओबामांचा नवा खुलासा

Patil_p

प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम 24 ऐवजी 23 जानेवारीपासून

Patil_p

कर्नाटकचे पर्यटन मंत्री सी. टी. रवी यांना कोरोनाची लागण

Patil_p

आंतरराष्ट्रीय सीमेवरील घुसखोरीचा प्रयत्न BSF ने रोखला

datta jadhav

अनोखी लग्नपत्रिका, अहेराचा दिला पर्याय

Patil_p

‘ऑपरेशन लोटस’वरून आप-भाजपात जुगलबंदी

Patil_p