Tarun Bharat

आधार सोसायटीची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

Advertisements

प्रतिनिधी/ बेळगाव

महाव्दार रोड येथील श्री आधार मल्टिपर्पज सौहार्द सहकारी सोसायटीची दहावी वार्षिक सर्वसाधारणसभा गुरूवारी सकाळी संपन्न झाली. चेअरमन भोमाणी बिर्जे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.

व्यासपीठावर संस्थापक प्रदीप अष्टेकर, अनंत लाड, व्हा. चेअरमन बाळासाहेब चोपडे उपस्थित होते. व्यवस्थापक के. बी. संकण्णावर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर दिवंगतांना श्रध्दांजली वाहण्यात आली. गेल्या वषीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल सादर केल्यानंतर ताळेबंद व नफा, तोटा पत्रकाचे वाचन करण्यात आले आणि आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात आला.

4 कोटी 55 लाख ठेवी, 4 कोटी 17 लाख कर्जे व 1 कोटी 69 लाख गुंतवणूक, 18 लाख 9 हजार भागभांडवल, राखीव निधी 1 कोटी 7 लाख असून 5 लाख 41 हजार रुपयांचा नफा झाल्याची माहिती चेअरमन सुभाष देसाई यांनी दिली. सभासदांना 10 टक्के लाभांश वितरण करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

यावेळी प्रदीप अष्टेकर, अनंत लाड यांचीही भाषणे झाली. चर्चेत भोमाणी बिर्जे, सुनील चौगुले, अनंतराव पाटील, विकास मजुकर आदींनी भाग घेतला. व्हा. चेअरमन बाळासाहेब चोपडे यांनी आभार मानले. संचालक राम बाचोळकर, महादेव ठोकणेकर, बी. टी. दंडगलकर, ए. एन. अमरगोळ, कल्पना मोहीते, पूजा गुरव आदी उपस्थित होते.

Related Stories

पिरनवाडी येथील उरुसाला जिल्हाधिकाऱयांकडून परवानगी

Amit Kulkarni

‘सदाफुली’ काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा उत्साहात

Amit Kulkarni

लम्पिस्कीनमुळे मुतग्यातील 4 जनावरे दगावली

Amit Kulkarni

हिंडलगा येथील जवानाला राष्ट्रपतींकडून लेफ्टनंट पद बहाल

Patil_p

केंद्रीय पथकाकडून हुक्केरी, गोकाक तालुक्याला भेट

Patil_p

जनताच करणार कॅन्टोन्मेंट उपाध्यक्षांची निवड

Patil_p
error: Content is protected !!