Tarun Bharat

आनंदची यांगईविरुद्ध बरोबरी

Advertisements

टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा

विज्क आन झी (द नेदरलँडस्) / वृत्तसंस्था

भारताचा अनुभवी ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद येथील टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीअखेरही विजयापासून दूरच राहिला. चीनच्या यू यांगईविरुद्ध त्याला बुधवारी बरोबरीवर समाधान मानावे लागले. यादरम्यान नॉर्वेचा वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसनने सलग 111 सामन्यात अपराजित राहत 15 वर्षांपूर्वीचा विश्वविक्रम मोडीत काढला.

दुसऱया फेरीत वेस्ले सो याच्याकडून पराभूत झालेला आनंद सध्या रशियाच्या निकिटा व्हितुईगोव्हसह संयुक्त 11 व्या स्थानी तर यू यांगई 1 गुणासह 13 व्या स्थानी आहे. 14 खेळाडूंचा सहभाग असलेल्या व राऊंड रॉबिन पद्धतीने खेळवल्या जाणाऱया या स्पर्धेत अद्याप 9 फेऱया बाकी असून बेलारुसचा ब्लादिस्लाव्ह कोव्हालेव्ह तळाच्या स्थानी आहे.

कार्लसनने लोकल खेळाडू जॉर्डन व्हान फॉरेस्टविरुद्ध बरोबरी प्राप्त केली आणि 111 सामन्यात अपराजित राहण्याची परंपरा अबाधित राखली. मूळ रशियाचा व नंतर डचमध्ये स्थायिक झालेला सर्जेई तिव्हियाकोव्हचा 15 वर्षांपूर्वीचा विक्रम यावेळी मोडीत निघाला. अमेरिकेचा वेस्ले सो आता पहिल्या स्थानी विराजमान असून बुधवारी त्याने इराणच्या ऍलिरेझा फिरोजाला स्पर्धेतील पहिला पराभव स्वीकारणे भाग पाडले. वेस्लेच्या खात्यावर शक्य असलेल्या 4 पैकी 3 गुण असून कारुआना फॅबिआनो, जेफरी क्झिओंग, फॉरेस्ट, फिरोजा व ब्लादिस्लाव्ह अर्तेमिएव्ह त्यानंतर अनुक्रमे स्थानी आहेत.

पहिल्या चारही सामन्यात बरोबरी नोंदवणारा कार्लसन नेदरलँडचा अनिश गिरी, रशियाचा डॅनिल डुबोव्ह, पोलंडचा जान-क्रिझिस्तोफ यांच्यासह संयुक्त सातव्या स्थानी आहे. या सर्व ग्रँडमास्टर्सच्या खात्यावर प्रत्येकी 2 गुण आहेत. चॅलेंजर गटात भारताच्या सुर्यशेखर गांगुलीने कझाकस्तानच्या दिनारा सॅदुकासोव्हाविरुद्ध सनसनाटी विजय प्राप्त करत 3 गुण संपादन केले व तो गुणतालिकेत अव्वलस्थानीही झेपावला. मॅक्स वार्मरडॅमविरुद्ध स्पर्धेतील आपली पहिली लढत जिंकत निहाल सरीन या आणखी एक भारतीय खेळाडूने संयुक्त दुसऱया स्थानापर्यंत झेप घेतली.

Related Stories

सामना ड्रॉ, टाय झाल्यास भारत-न्यूझीलंड संयुक्त विजेते

Patil_p

भारत मालिकाविजयासाठी सज्ज

Patil_p

‘हिटमॅन’ रोहितचे क्लासिक दीडशतक

Patil_p

अश्व दौड चाचणी स्पर्धा मुंबईत

Patil_p

हिटमॅनचा नवा विक्रम : वनडेमध्ये वेगवान 7 हजार धावा

prashant_c

गुजरात जायंटस्चा दुसरा विजय

Patil_p
error: Content is protected !!