Tarun Bharat

आनंदनगरातील डेनेजवाहिनी दुरुस्तीकडे दुर्लक्ष

परिसरातील विहिरी-कुपनलिकांचे पाणी दूषित : नागरिकांत संताप

प्रतिनिधी /बेळगाव

वडगाव, आनंदनगर तिसरा क्रॉस येथे डेनेजवाहिनीला गळती लागल्याने सांडपाणी नाल्यामध्ये वाहत आहे. त्यामुळे परिसरातील विहिरी आणि कुपनलिकांचे पाणी दूषित झाले आहे. सदर डेनेजवाहिनीच्या दुरुस्तीच्या नावावर केवळ सिमेंट लावण्याचा प्रकार करण्यात आला आहे. मात्र या समस्येचे कायमस्वरुपी निवारण करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आनंदनगर परिसरातील समस्यांचे निवारण करण्याकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. येथील नाल्याची स्वच्छता तसेच रस्त्यांचे डांबरीकरण अशा विविध समस्यांबाबत सातत्याने तक्रारी केल्या जातात. मात्र केवळ दिखाऊपणाची कार्यवाही करून नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार प्रशासनाकडून केला जात आहे. यापूर्वी येथील नाल्यासंदर्भात अनेकवेळा तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे नाल्याच्या सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र काही अडचणींमुळे हे काम रखडले असून याबाबत अद्यापही तोडगा काढण्यात आला नाही. तसेच आनंदनगर परिसरातील काही रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. तर काही रस्त्यांचे डांबरीकरण करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या रस्त्यांचे डांबरीकरण कधी होणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

अशातच येथील डेनेजवाहिन्यांची समस्या निर्माण झाली असून तिसरा क्रॉस येथे डेनेजवाहिनीला दोन महिन्यांपासून गळती लागली आहे. ड्रेनेजवाहिनीचे सांडपाणी गटारी व नाल्यांद्वारे वाहत आहे. परिणामी परिसरातील कुपनलिका आणि विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. सदर डेनेजवाहिनीची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली होती. याची दखल घेऊन काही ठिकाणी नाल्याची स्वच्छता करण्यात आली. काही ठिकाणी गटारीमधील कचरा हटवून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच गळती लागलेल्या डेनेजवाहिनीला सिमेंट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण गळतीचे निवारण झाले नाही. त्यामुळे सांडपाणी वाहत असल्याने ही समस्या कायमस्वरुपी निकालात काढावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

बागलकोट जिल्हय़ात 123 जणांना कोरोना

Patil_p

मळेकरणीदेवी मंदिर परिसरात जायंट्स सखीतर्फे डस्टबीनचे वितरण

Amit Kulkarni

कुस्तीगीर संघटनेतर्फे डॉ. आंबेडकर जयंती साजरी

Amit Kulkarni

‘त्या’ नर्सना पुन्हा सेवेत घ्या

Omkar B

इराकच्या बाळावर बेळगावमध्ये शस्त्रक्रिया

Omkar B

वाढदिवसानिमित्त सेवा करण्याची संधी लाभली हे माझे भाग्य ; अलिष्का बेनके

Rohit Salunke