Tarun Bharat

आनंदवाडीतील नागरिकांची मनपाकडे धाव

प्रतिनिधी/ बेळगाव

आनंदवाडी परिसरात कचऱयाची उचल करणारे वाहन वेळेवर येत नसल्याने परिसरात कचरा टाकला जातो. त्यामुळे गटारी तुंबल्या असून, दुर्गंधी पसरली आहे. परिणामी रहिवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. स्वच्छतेसाठी आवश्यक कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आनंदवाडी युवक मंडळ आणि महिला मंडळाच्यावतीने महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांना देण्यात आले.

शहरातील कचऱयाची उचल वेळेवर केली जात नसल्याच्या तक्रारी कायम करण्यात येतात. पण याची दखल घेण्यात येत नाही. वारंवार तक्रारी करूनही महापालिकेच्या अधिकाऱयांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आनंदवाडी परिसरातील रहिवाशांनी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांची गुरुवारी भेट घेऊन समस्या मांडल्या. वेळेवर कर भरणा तसेच कचरा शुल्क भरूनही आनंदवाडी परिसरातील रहिवाशांच्या समस्यांचे निवारण केले जात नाही. या परिसरात गटारीची स्वच्छता केली जात नाही. तसेच कचरा वाहतूक करणारे वाहन वेळेवर येत नसल्याने कचरा साचून राहतो. परिणामी नागरिक रस्त्याशेजारी किंवा घरामागे कचरा टाकत आहेत. त्यामुळे परिसरात कचऱयाचे ढीगारे साचून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. डेंग्यू, मलेरिया व अन्य रोगांना आमंत्रण मिळत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे.

येथील समस्यांचे निवारण करण्यासाठी अनेकवेळा निवेदन देऊनही मनपा अधिकाऱयांनी या भागात पाहणी केली नाही. येथील गटारी स्वच्छ केल्या नाहीत. तसेच कचरा वाहन वेळेवर पाठविण्यात येत नाही. त्यामुळे हा परिसर अस्वच्छ बनत चालला आहे. येथील स्वच्छतेचे काम तातडीने घेऊन कचरावाहू वाहन वेळेवर पाठविण्यात यावे व गटारींची स्वच्छता करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. येथील स्वच्छतेचे काम व समस्यांचे निवारण आठ दिवसात न केल्यास रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महापालिका आयुक्तांना देण्यात आला आहे. सदर निवेदन देताना युवक मंडळाची व आनंदवाडी महिला मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Related Stories

हिंदवी स्वराज्य युवा संघातर्फे मण्णूरमध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा

Patil_p

हिंडलगा लक्ष्मीनगर येथे अतिक्रमण करून खोदली कूपनलिका

Amit Kulkarni

शिवाजी कॉलनी, टिळकवाडी येथे पाणी गळती

Patil_p

‘त्या’ कारखान्यामुळे पर्यावरण दूषित

Amit Kulkarni

लाल-पिवळय़ाविरोधात 8 मार्च रोजी मोर्चा

Amit Kulkarni

धारवाडजवळ भीषण अपघातात चार ठार

Patil_p