Tarun Bharat

‘आनंदी गोपाळ’ चित्रपटाला संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार

 ऑनलाईन टीम / पुणे :

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन आयोजित 18 व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दिमाखदार समारोप सोहळा प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे पार पडला. यावेळी ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाने यावषीच्या ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ पुरस्कारावर आपली मोहोर उमटविली. तर ‘अ सन’ या ‘ट्युनिशियन चित्रपटाने ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ पटकावला.  पुरस्कारांची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी समारोपाच्या कार्यक्रमात केली.

रोख रुपये पाच लाख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र हे ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारा’चे तर रोख रुपये दहा लाख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र हे ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा’चे स्वरूप आहे. हे दोन्ही पुरस्कार दरवषी राज्य शासनाच्या वतीने प्रदान करण्यात येतात. सुजय डहाके दिग्दर्शित ‘तुझ्या आईला’ या चित्रपटाने परिक्षकांची पसंती पुरस्कार, अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सर्वोत्कृष्ट मराठी पटकथा, सिनेमेटोग्राफी (छायाचित्रण) व प्रेक्षकांच्या पसंतीचा पुरस्कार मिळाला.

यावेळी प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले, प्रसिद्ध ध्वनि दिग्दर्शक व ध्वनी डिझायनर बिश्वदीप चॅटर्जी, महोत्सवाचे सचिव रवी गुप्ता, महोत्सवाचे कलात्मक दिग्दर्शक समर नखाते, ‘पिफ’चे निवड समिती सदस्य मकरंद साठे, सतीश आळेकर, अभिजित रणदिवे, अभिजित देशपांडे, डॉ. मोहन आगाशे यांबरोबर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, चित्रपटांच्या परीक्षणासाठी जगभरातून आलेले परीक्षक यांबरोबरच एमआयटी-एटीडीच्या डॉ. सुनीता कराड आदि उपस्थित होते.

पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवषी पार पडणाऱया पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे हे 18 वे वर्ष होते. ज्यामध्ये 60 देशांतील 191 हून अधिक चित्रपटांचा आस्वाद पुण्यातील चित्रपट रसिकांना घेता आला.

यावषी समीर विध्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाने ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ पुरस्कार पटकाविला. या चित्रपटाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने रोख रूपये पाच लाख, मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या पुरस्काराच्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम ही दिग्दर्शक व 50 टक्के रक्कम ही निर्मात्यांना दिली जाते.

याबरोबरच दरवषी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वतीने देण्यात येणारा मराठी स्पर्धात्मक विभागातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार यावषी अजित वाडीकर (वाय) यांना, सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ) यांना, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मुक्ता बर्वे (वाय) यांना,सर्वोत्कृष्ट पटकथा लेखक पुरस्कार नियाज मुजावर (तुझ्या आईला) यांना तर सर्वोत्कृष्ट सिनेमेटोग्राफी पुरस्कार विजय मिश्रा (तुझ्या आईला) यांना प्रदान करण्यात आला. प्रत्येकी रोख रुपये 25 हजार, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. याशिवाय सुजय डहाके दिग्दर्शित ’तुझ्या आईला’ व मेहडी बरसौई दिग्दर्शित ’अ सन’ या चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीचा (ऑडियन्स अवॉर्ड) पुरस्कार देत गौरविण्यात आले.

याबरोबरच आंतरराष्ट्रीय चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात मेहडी बरसौई दिग्दर्शित ‘अ सन’ या चित्रपटाला ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरकार’ देत गौरविण्यात आले. रोख रु. 10 लाख मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराच्या रकमेपैकी 50 टक्के रक्कम ही दिग्दर्शक व 50 टक्के रक्कम ही निर्मात्यांना दिली जाते. तर याच विभागातील ‘प्रभात सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शक पुरस्काराने ‘सुपरनोवा’ चित्रपटाचे दिग्दर्शक बर्तोज कृहलिक यांना गौरविण्यात आले. रोख रुपये 5 लाख व मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आंतरराष्टीय चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात ‘अ सन’ चित्रपटाला प्रेक्षकांच्या पसंतीचा (ऑडियन्स अवॉर्ड) पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावषीपासून पुणे फिल्म फाउंडेशन आणि एमआयटी आर्ट, डिझाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एमआयटी-एसएफटी ह्युमन स्पिरीट’ पुरस्कार सुरु करण्यात आला आहे. यावषी ‘मार्केट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रदीप कुरबाह यांना हा पुरस्कार एमआयटी-एडीटीच्या डॉ. सुनीता कराड यांच्या हस्ते देण्यात आला.

आंतरराष्ट्रीय चित्रपट स्पर्धा-

पटकथा लेखनाचा परीक्षक विशेष पुरस्कार – मायकल इडोव (चित्रपट – द ह्युमरिस्ट)

परिक्षक विशेष प्रमाणपत्र – चित्रपट ‘मारिघेल्ला’

विद्यार्थी लघुपट पुरस्कार-

बेस्ट लाईव्ह ऍक्शन लघुपट पुरस्कार – चित्रपट ‘अ पीस ऑफ होप’ – (दिग्दर्शक स्याहरेझा फाहलेवी)

बेस्ट लाईव्ह ऍक्शन लघुपट दिग्दर्शक पुरस्कार – अलीरेझा घासेमी

ऍनिमेशन लघुपट पुरस्कार-

सर्वोत्कृष्ट ऍनिमेशन लघुपट-

1) मझाईक्स आर्क 2) स्टीप्स ऑफ खजर

3) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – चित्रपट स्टीप्स ऑफ खजर (दिग्दर्शक सोफिया मेलनेक)

आदिवासी लघुपट पुरस्कार-

1) चित्रपट ‘द माइटी गोंट्स ब्रिक्स ऑफ चंदागड – विप्लव शिंदे

2) चित्रपट पडकाई – दिग्दर्शक अमर मेलगीरी

3) चित्रपट रानी बेटी – दिग्दर्शक धर्मा वानखेडे

 

Related Stories

माकपच्या आंदोलकांना पोलिसांनी नेले फरफटत

Archana Banage

सोलापूर शहरात 94 कोरोना पॉझिटिव्ह,एक मृत्यू

Archana Banage

बार्शी शहरात दोन कोरोना रुग्णांची वाढ

Archana Banage

…अन्यथा कर्नाटक केंद्रशासित राज्य म्हणून घोषित करावे

prashant_c

आयपीएल क्रिकेटचा सट्टा चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Archana Banage

माढा तालुक्यात कोरोना बाधितांचा उच्चांक; तब्बल ५४ बाधितांची वाढ

Archana Banage